shobha_bendre
shobha_bendre 
विश्लेषण

पालकमंत्री पाटलांच्या उपस्थितीत पोलिसांची महापौर बोंद्रे यांना धक्काबुक्की

सदानंद पाटील

कोल्हापूर : मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली. या प्रकाराचा महापौर व उपमहापौर यांनी निषेध व्यक्त केला.


गणेश विसर्जन मिरवणुकीला कोल्हापूरचा मनाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजनाने सुरवात होते. या वेळी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असते.

आज (ता. 23) पालखी पूजन आणि श्रींच्या आरतीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली.

या वेळी येथे उपस्थित असणाऱ्या अनेक माध्यम कर्मीना देखील पोलिसांच्या ह्या अरेराविचा सामना करावा लागला. मिरवणुकीच्या सुरवातीलाच हा प्रकार घडल्यामुळे काही काळासाठी परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT