विश्लेषण

वंचित आघाडी - एमआयएमची आघाडी तुटली : इम्तियाज जलील

माधव सावरगावे

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकरजी यांनी आम्हाला फक्त आठ जागा देऊ केल्या. एवढ्या कमी जागा आम्हाला मान्य नाहीत त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला प्रकाशजी आंबेडकर यांच्याविषयी आदर असून आम्ही वंचित आघाडीला शुभेच्छा देतो, अशा शब्दात एमआयएमचे खासदार  इम्तियाज जलील यांनी एवढी तुटल्याचे जाहीर केले  
इम्तियाज जलील म्हणाले,  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब आंबेडकरजी यांच्याशी सुमारे दोन महिन्यांपर्यंत झालेल्या दीर्घ चर्चेनंतर दोन्ही पक्षांमध्ये सन्माननीय जागावाटपाचा तोडगा निघू शकला नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ विधानसभा जागांपैकी केवळ आठ जागा एआयएमआयएमला आघाडीचे भागीदार म्हणून देण्याचे वंचित बहुजन आघाडीने सांगितले . या यादीमध्ये औरंगाबाद मध्यवर्ती एआयएमआयएमच्या जागेचा समावेश नसल्यामुळे हे अस्वीकारार्ह आहे.  

खासदार जलील पुढे म्हणाले, आमचे पक्षाचे नेते डॉ. गफ्फार कादरी यांनीही बाळासाहेबांशी गेल्या पाच सप्टेंबर रोजी पुण्यातील अनेक बैठका घेतल्या होत्या. बाळासाहेब आणि त्यांच्या संसदीय मंडळाचे सदस्य अण्णाराव पाटील यांनीही या निर्णयाबद्दल माहिती दिली होती. बाळासाहेबांनी श्री ओवेसी यांना ईमेल पाठवला आहे की आपण एआयएमआयएमला 8 जागा देऊ. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एआयएमआयएमने २०१४  मध्ये २४ जागा लढवल्या होत्या. आम्ही औरंगाबाद व भायखळा येथून अनुक्रमे दोन आमदार जिंकले होते आणि नऊ जागांवर आम्ही दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर होतो. आज पक्षाकडे महाराष्ट्रात सुमारे १५०  नगरसेवक आणि विविध जाती व समुदायातील नगरसेवक आहेत. 

औरंगाबाद महानगरपालिकेतआमचे २६  नगरसेवक आहेत. आमचे विरोधी पक्षनेते आणि एएमसी मधील गटनेते सरिता अरुण बोर्डे आणि श्री गंगाधर ढगे हे अनुसूचित जातीतील आहेत. बाळासाहेब आंबेडकरजींचा आम्ही आदर आणि सन्मान करतो आणि आम्ही ते करत राहू. आम्ही त्यांना  आणि वंचित बहुजन आघाडीला  शुभेच्छा देतो. औरंगाबादमध्ये घेण्यात येणाऱ्या  संभाव्य उमेदवारांच्या मुलाखतींचे वेळापत्रक एआयएमआयएम जारी करणार आहे., असेही इम्तियाज जलील म्हणाले . 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT