Minsiter Abdul Sattar sillod news
Minsiter Abdul Sattar sillod news 
विश्लेषण

राज्यमंत्री सत्तार यांनी तालुक्यात शिवसेनेला घवघवीत यश मिळवून दिले; ८३ पैकी ५५ ग्रामपंचायती ताब्यात

सरकारनामा ब्युरो

सिल्लोड : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघात वर्चस्व कायम राखत ८३ पैकी ५५ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवल्याचा दावा केला आहे. भाजपला धूळ चारत तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात घेत सत्तार यांनी आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या कट्टर विरोध प्रभाकर पालोदकरांच्या पालोदमध्ये देखील शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर संपर्कमंत्री म्हणून देखील हिंगोलीसह अन्य जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे मतदारसंघात त्यांना फारसा वेळ देता आला नाही. मात्र असे असतांना देखील सत्तार व त्यांच्या समर्थकांनी घवघवीत यश मिळवत शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. तालुक्यातील सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार सत्तार यांच्या हस्ते संपर्क कार्यालयात करण्यात आला.

ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी एकमेकांना लाडू-पेढे भरवत विजयोत्सव साजरा केला. होती. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावागावांत भेटी देऊन शिवसेनाप्रणीत पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीण जनता शिवसेनेनेच्या पाठीमागे भक्कम पणे उभी राहिली.

या ग्रामपंचायतीवर भगवा..

तालुक्यातील पालोद, अंभई , घाटनांद्रा, आमठाना अजिंठा केरहाळा, बोरगाव सारवाणी आदी प्रमुख ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद विजय मिळवला. तर मंगरूळ, पालोद, अंभई, कायगाव, बाभूळगाव, वांगी खुर्द, वांगी बुद्रुक, वडाळा, केरहाळा, धानोरा, वदोडचाथा, देऊळगाव बाजार, बोदवड, सराटी इत्यादी ग्रामपंचायतींवर परिवर्तन होऊन येथे शिवसेनेने भाजपला धक्का देत विजय संपादन केला.

तालुक्यात निवडणुकीपूर्वी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या . यात ६ पैकी मुखपाठ, पिंपळगांव घाट / शेखपूर, चिंचखेडा, सासुरवाडा व खंडाळा या ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने बिनविरोध विजय मिळवला होता. या निवडणुकीत भाजपचे श्रीरंग पाटील साळवे, सुनील मिरकर, गजानन राऊत, काकासाहेब फरकाडे, शंकर माने यांना त्यांच्याच गावात शिवसेनेने धूळ चारली.

भाजप नेत्याना ग्रामपंचायत निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.  भाजपचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्या मांडणा गावातही ९ पैकी ४ सदस्य हे शिवसेनेचे निवडुन आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT