विश्लेषण

एका हातात झेंडा आणि दुसऱ्या हातात धोंडा घेऊन काम करणार - शिशिर शिंदे : मनसेला केला 'जय महाराष्ट्र'

सरकारनामा ब्युरो

मुंबई - मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी मुंबईत शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे शिवबंधन बांधले. गेले अनेक दिवस शिंदे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळेच राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकारी निवडणुकीपासून त्यांना दूर ठेवले होते. आपण यापुढे एका हातात भगवा झेंडा आणि एका हातात धोंडा घेऊन काम करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मनसेने आपली तयार केली. यामध्ये राज ठाकरे अध्यक्ष, तर 10 नेते आणि 12 सरचिटणीस असणार आहेत. मनसेने नव्या कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला पाठवली. 20 मे रोजी मनसेची पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक पार पडली होती. शिंदे हे मनसेला रामराम करणार असल्याच्या बातम्या सातत्याने येत होत्या. मात्र, त्यांनी आपण कधीही राजसाहेबांची साथ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही काही दिवसांपूर्वी त्यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू होती. काल त्यांचा नव्या टीममध्ये कुठेच समावेश दिसला नाही. अखेर शिंदे यांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' करुन शिवबंधन बांधले.

यावेळी बोलताना शिशिर शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांची भेट झाली. निघताना त्यांनी माझा हात हातात घेतला. मला उद्धव ठाकरेंच्या हातात बाळासाहेबांचा स्पर्श जाणवला. म्हणून मी हा निर्णय पक्का केला. वयाच्या सोळाव्या वर्षी मी एका हातात भगवा घेतला आणि दुसऱ्या हातात धोंडा घेतला. मी आज बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या छत्रछायेखाली आलो. यापुढे हा शिशिर शिंदे एका हातात भगवा आणि एका हातात धोंडा घेऊन पुन्हा कामाला सुरुवात करेल. शिशिर शिंदेंची पाठ कधी जमिनीला लागणार नाही. मला शिवसैनिकांनी आपले म्हणावे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT