MNS vote share sarkarnama
विश्लेषण

MNS Politics : मनसेचा घसरणारा टक्का उद्धव ठाकरेंच्या कामी येईल का? आकडे खोटं नाही बोलतं!

MNS Shivsena Ubt Yuti : 2024 ची विधानसभा निवडणूक लढणाऱ्या मनसेचे 125 उमेदवार रिंगणात होते. मात्र, त्यातील एकही विजयी होऊ शकला नाही.

Roshan More

Raj Thackeray News : जे महाराष्ट्राच्या मनात आहे तोच निर्णय होईल. संदेश कशाला बातमी देतो, असे उद्धव ठाकरेंनी सांगून मनसेसोबत युतीसाठी हालचाली सुरू असल्याचे संकेत दिले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्ष मोठ्या संकटात सापडला आहे. पक्ष फुटीतून लोकसभेला ठाकरे सावरले असे वाटत असताना विधानसभा निवडणुकीत पुरती धुळधाण उडाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला अवघ्या 20 जागा आल्या. मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी उभारी घेण्याची शेवटी संधी ठरणार आहे.

उद्धव ठाकरे अडचणीत असताना राज ठाकरेंचा पक्ष मनसेची कामगिरी बरी म्हणावी अशी देखील नाही. लोकसभेला महायुतीला पाठींबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभा स्वबळावर लढली. मात्र, त्यांच्य हाती भोपळा आला. एकही उमेदवार मनसेचा विजयी होऊ शकला नाही. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही राज ठाकरे यांच्या देखील अस्तित्वाचा प्रश्न असणार आहे.

मनसेच्या हाती भोपळा

राज ठाकरेंचे वलय आहे. त्यांचा सभांना गर्दी होते मात्र प्रत्यक्षात त्याचे मतांमध्ये किती परिवर्तन होते हे पाहिले तर निराशाच हाती येईल. कारण 2024 ची विधानसभा निवडणूक लढणाऱ्या मनसेचे 125 उमेदवार रिंगणात होते. मात्र, त्यातील एकही विजयी होऊ शकला नाही. 125 जागा लढणाऱ्या मनसेच्या वाट्याला अवघी 1.6 टक्के मते मिळाली.

मनसेची उभारी ते घसरण

मनसेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा 2009 ची विधानसभा निवडणूक ते लढले. या निवडणुकीत तब्बल 5.7 टक्के मतं मनसेच्या वाट्याला आली आणि 13 आमदार देखील विजयी झाले. मात्र, 5.7 टक्क्यावरून मनसेची 2014,2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मोठी घसरण झाली. आता मनसेच्या वाट्याला अवघी 1.6 टक्के मते आली आहेत. आणि त्यांचा एकही आमदार विधानसभेत नाही.

उद्धव ठाकरेंपासून मुस्लिम मतं दुरावणार?

उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आल्यानंतर मुंबईतील मुस्लिम मतदार त्यांच्याकडे वळाले लोकसभा निवडणुकीत त्यांना त्याचा मोठा फायदा झाला. विधानसभा निवडणुकीत मुंबईत मराठी आणि मु्स्लिम मतांनीच उद्धव ठाकरेंना तारले. मात्र, राज ठाकरे यांची मुस्लिम मतदारांबाबतची भूमिका ही नेहमीच वादग्रस्त राहिली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मशि‍दीवरील भोंगे काढण्यासाठी मनसेने मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे मनसे उद्धव ठाकरेंच्यासोबत आली तरी मुस्लिम मतदार त्यांच्यासोबत राहणार का याबाबत संभ्रम आहे.

मराठी मतं एकजुट होईल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची युती झाल्याने मराठी मते एकजुट होतील, अशी शक्यता आहे. तरीसुद्धा मुंबईतील 227 जागांपैकी 120 जागांवर मराठी मतांचे प्राबल्य आहे. मात्र, इतर जागांवर उत्तर भारतीय, मुस्लिम, गुजराती यांचे वर्चस्व आहे. या स्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि भाजपकडेसुद्धा मराठी मते आकर्षित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकनाथ शिंदेंने उद्धव ठाकरेंसोबत असलेले तब्बल 40 माजी नगरसेवक आपल्याकडे वळवून त्या जागांवर आपला दावा मजबूत केला आहे.

उद्धव ठाकरेंसाठी मनसेची साथ धोक्याची?

निवडणुकीच्या राजकारण ठाकरे ब्रँड धोक्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र यावे, अशी चर्चा सुरू होती. मात्र, खरंच दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिकेत काही फरक पडले का? विशेषता मनसेसोबत जाण्यासाठी ठाकरेंना काँग्रेसची साथ सोडावी लागण्याची शक्यता आहे. अशा वेळी मनसेसोबतची युती उद्धव ठाकरेंसोबत फायद्याची ठरेल हे आत्तातरी स्पष्ट नाही. मात्र, मनसेची मागील काही वर्षात खालावली कामगिरी ही उद्धव ठाकरेंची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

मनसेच्या मतांची टक्केवारी

विधानसभा निवडणूक मतांचा टक्का

2009 5.7

214 3.2

2019 2.3

2024 1.6

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT