modi gives new idea to fight against coroa 5 april 9 pm 9 minutes flash light
modi gives new idea to fight against coroa 5 april 9 pm 9 minutes flash light 
विश्लेषण

मोदींचा नवा संकल्प : 5 एप्रिलला रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाइट फ्लॅश करा

सरकारनामा ब्युरो

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येत्या रविवारी पाच एप्रिल रोजी तुमच्याकडून हवी आहेत नऊ मिनिटे. आज सकाळी नऊ वाजता राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात मोदींनी पाच एप्रिलला 130 भारतीयांकडून पाच एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे मागितली आहेत. 

या काळात कोरोनाच्या अंध:काराशी लढण्यासाठी त्यांनी देशवासियांना महासंकल्प दिला आहे. मोदींनी संदेशात म्हटले आहे, की 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील सर्व लाइटस बंद करा आणि दरवाजात किंवा बाल्कनीत या.  मेणबत्ती, दिवा, टाॅर्च किंवा मोबाईल फ्लॅश लाइट नऊ मिनिटे झळकवा. यातून कोरोनाशाचा अंधकार दूर  होऊन प्रकाशाकडे आपण मार्गक्रमण करू. कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिंकण्याची शक्ती यातूनच मिळणार आहे. 

या वेळी जनता कर्फ्यूबरोबरच लाॅकडाऊनच्या काळात दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT