विजयसिंह मोहिते पाटील भाजपसाठी "आपले'! 
विजयसिंह मोहिते पाटील भाजपसाठी "आपले'!  
विश्लेषण

विजयसिंह मोहिते पाटील भाजपसाठी "आपले'! 

सरकारनामा ब्युरो

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघातील खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांची पूर्णवेळ उपस्थिती लक्षवेधी ठरली. या दौऱ्यात भाजपच्या डॉ. दिलीप येळगावकर यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मोहिते पाटील यांना जाहीरपणे "आपले' म्हटल्याने नव्या समीकरणांची चर्चा ठळक झाली आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस हे दोन दिवस साताऱ्यात होते. या दौऱ्यात गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटन झाले. या उद्‌घाटन कार्यक्रमास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. उद्‌घाटनानंतर मुख्यमंत्री कार्यालयाची पहाणी करत असताना सहपालकमंत्री सदाभाऊ खोत आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चर्चा करत करत नियोजन भवनाकडे गेले. बैठक संपल्यावर मुख्यमंत्री शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी चहापानासाठी गेले. पण त्यांचे हे चहापान प्रेमाचे की राजकीय, याची सध्या चर्चा रंगली आहे.

शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री कोरेगाव, खटाव आणि माण तालुक्‍यातील जलयुक्तच्या कामांच्या पाहणीसाठी गेले. त्यावेळी संपूर्ण दौऱ्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. 
माणमधील सीसीटीची पाहणी करताना किरकसालचे राष्ट्रवादीचे सरपंच अमोल काटकर यांची विजयसिंह मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी ओळख करून दिली. त्यावेळी ते आमचे कार्यकर्ते असे म्हणाले, त्यावर डॉ. दिलीप येळगावकरांनी आमचे नव्हे आता आपले म्हणाकी, असा चिमटा काढला. हा चिमटा अनेकांच्या भुवया वर करून गेला.

आगामी काळात केवळ साताऱ्यातच नव्हेत तर माढ्यातही कमळाची पेरणी होण्याचे संकेत मिळत आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी माण, खटावचा दौरा केला. या दौऱ्यात मात्र, विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित नव्हते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT