विश्लेषण

जामखेडमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा आमच्या सभेला चौपट गर्दी!

सरकारनामा ब्युरो

कऱ्हाड (सातारा): मला बघायला गर्दी होत असती तर ती बघून गेली असती. मात्र लोक तीन-तीन तास पावसातही ऐकायला थांबतात. जामखेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा चौपट गर्दी शिवस्वराज्य यात्रेला होती, यावरून मिळणारा प्रतिसाद स्पष्ट होत असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

डॉ. कोल्हे म्हणाले, राज्याच्या प्रत्येक गावात, नाक्यावर तरूण तरूणींचे घोळके शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करून संवाद साधत आहेत. यात्रेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना तरूण वर्ग सत्तांतर केव्हा होणार? याची विचारणा करत आहेत. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्‍न, बेरोजगारी, कायदा सुव्यवस्था आदी प्रश्‍नामुळे प्रचंड अस्वस्थता आहे. युती शासनाने सर्वाचा अपेक्षाभंग केल्यने लोकांत सरकारविषयी प्रचंड रोष पहायला मिळतो आहे. 

शिवस्वराज्य यात्रेच्या गर्दीबाबत ते म्हणाले, मल बघायला गर्दी होत असती तर ती बघून गेली असती. मात्र लोक तीन-तीन तास पावसातही ऐकायला थांबतात. जामखेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा चौपट गर्दी शिवस्वराज्य यात्रेला गर्दी होती, ही बोलकी प्रतिक्रीया आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT