mp omrajenibalkar vote for grampanchyat news
mp omrajenibalkar vote for grampanchyat news 
विश्लेषण

गावच्या ग्रामंपचायतीवर खासदार राजेनिंबाळकर वर्चस्व कायम राखणार?

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व त्यांच्या पत्नी संयोजनी राजेनिंबाळकर यांनी  गोवर्धनवाडी (ता.उस्मानाबाद) येथे मतदानाचा हक्क बजावला. अगदी सकाळीच त्यानी रांगेत उभे राहत मतदान केले. जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतीची निवडणुकांचे आज मतदान होत आहे. ४२ गावामध्ये निवडणुकांपासुन अलिप्त राहत बिनविरोधाचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी महाविकास आघाडीचे घटकपक्ष यांनी भाजपविरुद्ध पॅनेल तयार केले आहे. शिवसेनेचे खासदार राजेनिंबाळकर यांचे मुळ गाव गोवर्धनवाडी येथे निवडणुकीचा फड रंगल्याचे दिसुन येत आहे. आतापर्यंत राजेनिंबाळकर यांनी एकतर्फी विजय मिळवत गावावर वर्चस्व राखल्याचे पाहयला मिळाले आहे. यावेळीही विरोधकानी पुर्ण शक्तिनिशी खासदाराच्या गटाला थोपविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याला जनता कितपत प्रतिसाद देणार हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.

लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद अशा सर्वच निवडणुकांमध्ये हे गाव सेनेला मोठी आघाडी देत आल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरवात झाल्यानंतर अगदी सुरवातीलाच खासदारांनी मतदान करुन ग्रामस्थासह जिल्ह्यातील नागरीकांना मतदानाचा हक्क बजाविण्याबद्दल अवाहन केले.

गावाचा विकास करतील अशा लोकांच्या हातात जनतेनी सत्ता द्यावी असे अवाहनही त्यानी यावेळी केले. जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे वर्चस्व असुन ते अबाधित राहिल असा विश्वास खासदार राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT