विश्लेषण

15 दिवस तळ ठोकूनही संजय पाटील मामेभावाचा पराभव टाळू शकले नाहीत! 

सरकारनामा ब्युरो

सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकी कॉंग्रेस आघाडीने 22 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यात मिरजेतील जाहीर आठ जागांमध्ये दोघांनी समान चार जागा जिंकल्या आहेत. 

सर्वात धक्कादायक निकाल प्रभाग पंधराचा लागला. खासदार संजय पाटील यांचे मामेभाऊ रणजीत सावर्डेकर पराभूत झाले. हे घराणे सांगलीतील प्रतिष्ठित असून भारतभीम जोतीरामदादा पाटील यांच्या नातसून सोनल पराभूत झाल्या. 

प्रभाग एकमध्ये राष्ट्रवादीचे नेते धनपाल खोत पराभूत झाले. इथे कॉंग्रेसला बाय करून स्वाभीमानी आघाडीत दाखल झालेले उपमहापौर विजय घाडगे विजयी झाले. इथे माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या पत्नी पद्मश्री, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, रईसा रंगरेज हे दोन्ही विजयी झाले. 

मिरजेत ऐनवेळी भाजपमध्ये दाखल झालेल्या नगरसेवक सुरेश आवटी यांनी प्रभाग 3 मधील सर्व उमेदवार विजयी करीत आपण अजिंक्‍य असल्याचे सिध्द केले. त्यांचा मुलगा संदीप विजयी झाला. प्रभाग 6 माजी महापौर मैन्नुदीन बागवान, माजी महापौर इद्रीस नायकवडी यांचे चिरंजीव अतहर नायकवडी, रजीया काझी, नर्गीस सय्यद यांनी विजय मिळवला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT