MPSC Exam in Next year April 
विश्लेषण

'एमपीएससी'ची पूर्व परीक्षा पाच एप्रिलला - 200 जागांसाठी होणार भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)राज्य शासनातील 15 पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गट अ आणि गट ब च्या 200 जागांचा समावेश आहे. पाच एप्रिल रोजी राज्यातील 37 केंद्रावर पूर्व परीक्षा होणार आहे. यासाठी 23 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत

ब्रिजमोहन पाटील

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)राज्य शासनातील 15 पदांसाठी भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गट अ आणि गट ब च्या 200 जागांचा समावेश आहे. पाच एप्रिल रोजी राज्यातील 37 केंद्रावर पूर्व परीक्षा होणार आहे. यासाठी 23 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत, असे एमपीएससीतर्फे कळविण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक नायब तहसिलदाराच्या 73 पदांची भरती केली जाणार आहे.

सहायक राज्यकर आयुक्त 10 पदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गट विकास अधिकारी 7, सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी 1, उद्योग उपसंचालक, तांत्रिक 1, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता 2 अशी वर्ग एकमधील 21 पदांची भरती केली जाणार आहेत. वर्ग ब मधील उपशिक्षणअधिकारी, शिक्षण सेवा 25, कक्ष अधिकारी 25, सहायक गट विकास अधिकारी 12, सहायक निबंधक सहकारी संस्था 19, उप अधिक्षक भूमी अभिलेख 6, उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग 1, सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी तत्सम 11 आणि नायब तहसिलदार 73 पदांची भरती केली जाईल.

पूर्व परीक्षेचा निकाल लागल्यानंतर त्यामध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 2,3 व 4 ऑगस्ट 2020 रोजी होण्याची शक्‍यता आहे. पूर्व परीक्षेसाठी अमागास वर्गासाठी 524 रुपये तर मागासवर्गीय व अथान उमेदवारांसाठी 324 रुपये शुल्क आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT