विश्लेषण

सेना देणार होती अडीच कोटी, पोहोचले मात्र दीडच : मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांची तक्रार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई  : आम्हाला मनसेतून सेनेत येण्यासाठी सेनेने अडीच कोटी रुपये 'ऑफर' केले होते. परंतु त्यातले आम्हाला दीडच पोहचले आहेत, अशी तक्रार नुकतेच 'मनसैनिकातून' 'शिवसैनिक' बनलेल्या 'त्या' नगरसेवकांनी केली आहे. मनसेतून सेनेत आलेल्या सहापैकी चार नगरसेवकांची बुधवारी दुपारी शिवाजी पार्कजवळील 'काॅफी बाय द बे' येथे मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी यांच्याबरोबर मीटिंग झाली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

ही मिटिंग करण्यासाठी नितीन सरदेसाई आणि संदीप दळवी यांच्यासोबत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा तेथे हजर होते. परंतु प्रत्यक्ष मीटिंगमध्ये देशपांडे यांचा सहभाग नव्हता तर ते बाहेर गाडीत बसून होते, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली.

आता या राजकीय नाटकाचा भांडाफोड लवकरच होऊन येत्या एक दोन दिवसात सहा नगरसेवकांच्या पक्षांतराला स्थगिती दिली जाईल, असेही म्हटले जात आहे. मनसेचे नगरसेवक फुटून शिवसेनेत जाण्यासाठी आशिष शेलार आग्रही आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. मनसेच्या वतीने आशिष शेलार यांनी या चौघांना प्रत्येकी पाच ऑफर केले आहेत. दोन आता मिळणार आणि उरलेले तीन भाजपाचा महापौर झाल्यावर. यामध्ये भाजप-शिवसेनेचे अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT