विश्लेषण

जळगाव, सांगली- मिरज-कुपवाड मनपासाठी 1 ऑगस्टला मतदान 

सरकारनामा ब्युरो

जळगाव :जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेसाठी तसेच वसई विरारच्या प्रभाग क्रमांक 97च्या रिक्त नगरसेवकपदाच्या पोटनिवडणूकीसाठी 1 ऑगस्टला मतदान होणार असून 3 ऑगस्टला मतमोजणी होईल.आजपासून आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. 

राज्य निवडणूक आयोगातर्फे आज दोन्ही महापालिका निवडणूकीचा आणि वसई विरार महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 97 च्या पोटनिवडणूकीसाठी अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या महापालिका क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यात येणार आहेत. 

निवडणूक कार्यक्रम असा. 
उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याचा तारीख:4 जुलै 
अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत :11जुलै 
अर्जाची छाननी :12 जुलै 
उमेदवार यादी :12जुलै 
अर्ज मागे घेण्याची अंतीम मुदत :17जुलै 
मतदान :1 ऑगस्ट 
मतमोजणी :3 ऑगस्ट 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT