विश्लेषण

पंकजा मुंडे उपोषण करणार ; देवेंद्र फडणवीसांसह अन्य भाजप नेतेही सहभागी होणार

सरकारनामा ब्युरो

बीड : गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगडावरुन केलेल्या आवाहनानुसार ता.27 जानेवारीला मराठवाड्यातील पाणी प्रश्नांसह अन्य प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. या उपोषणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह भाजप नेते सहभागी होणार आहेत. 

दरम्यान, एक दिवस आपल्या विभागासाठी, आपल्या भविष्यासाठी द्या, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी सोशल मिडीयावरुन केले आहे. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथगडावर झालेल्या गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात भाजप सुकाणू समिती सोडण्याची आणि शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या प्रश्नांवर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यभर फिरण्याची घोषणा केली होती. याच वेळी त्यांनी ता. 26 जानेवारीला मुंबईतील कार्यालयाच्या उद्‌घाटनाची आणि दुसऱ्या दिवशी ता. 27 जानेवारीला औरंगाबादला उपोषणाची घोषणा केली होती. 

दरम्यान, भाजप पदाधिकाऱ्यांच्या आग्रहावरुन आता कार्यालय उदघाटन पाच फेब्रुवारीला होणार आहे. पण, उपोषण मात्र ठरलेल्या तारखेलाच होणार आहे. यात मराठवाड्याचे हक्काचे पाणी, जलसंधारण, पाण्याचे संवर्धन व मराठवाड्याच्या प्रत्येक भागात पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या मुद्द्यांवर लाक्षणिक उपोषधण करुन मुख्यमंत्र्यांसह सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले जाणार आहे. त्यांच्या या उपोषणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे, मंत्री रावसाहेब दानवे आदी भाजप नेतेही सहभागी होणार आहेत. एक दिवस आपल्या विभागासाठी.. आपल्या भविष्यासाठी द्या अशी फेसबुकवर पोस्ट टाकून त्यांनी सहभागाचे आवाहन केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT