dhanajay-Munde 
विश्लेषण

धनंजय मुंडेंना मंत्रिपदच आणि दमदार खाते  ; निकटवर्तीयांचा दावा

Dattatrya Deshmukh

बीड : मागच्या पाच वर्षांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून पाडलेली छाप आणि स्वत: मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर ३० हजारांवर मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षाकडून चांगली बक्षीसी मिळेल असे मानले जात आहे. मंत्रीमंडळ विस्तात स्थान कि पक्षसंघटनेची धुरा अशी चर्चा असली तरी मुंडेंना मंत्रीपदच आणि दमदार खाते मिळणार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे.


महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्ताराचे घोडे अडलेले आहे. प्रत्येक पक्षांना मिळणारा वाटा आणि मिळणाऱ्या वाट्यातून विभागनिहाय वाटप असे पेच त्या - त्या पक्षापुढे आहेत.


 दरम्यान, राष्ट्रवादीला मिळणाऱ्या मंत्रीपदांचे वाटप करताना मराठवाड्याला प्रतिनिधित्व देताना धनंजय मुंडे की  अनुभवी राजेश टोपे असा पक्षापुढे पेच आहे. त्यामुळे टोपेंना मंत्रीपद व मुंडेंच्या खांद्यावर प्रदेशाध्यक्षपदाची धुरा असा तोडगा निघाल्याच्या बातम्या आहेत. मराठवाड्याला आणि संघटन कौशल्य आणि आक्रमक धनंजय मुंडेंना प्रदेशाध्यक्षद दिल्याने मराठवाड्यात पक्षविस्ताराला वाव मिळेल, असेही गणित मांडले जात होते. 


परंतु, धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा पक्षातील बड्या नेत्यांनी निरोप दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. त्यांना खातेही दमदार असेल असा विश्वासही निकटवर्तीयांना वाटत आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु असून महिनाअखेर होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी जाण्याची तयारीही समर्थकांनी आतापासूनच केली आहे. निकटवर्तीयांची माहिती खरी ठरते कि प्रदेशाध्यक्षपद मिळणार ही सुत्रांची माहिती खरी ठरते हे आठ दिवसांतच कळणार आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT