Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar sarkarnama
विश्लेषण

मला अर्थमंत्री होऊ द्या, वीस रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातल्या जनतेला स्वस्तात पेट्रोल (petrol) देण्याची इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवली तर राज्यात पेट्रोल वीस रूपयांनी कमी होऊ शकते, असे मत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तसेच माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटिवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केले. (Mungantiwar said Make me Finance Minister I will reduce petrol price by Rs. 20)

'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुनगंटिवार म्हणाले, मला अर्थमंत्री होऊ द्या, वीस रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आले तर पेट्रोलचे दर वीस रुपयांनी कमी करून दाखवतो, असा दावा मुनगंटिवार यांनी केला. महाविकास आघाडी सरकारला निर्णय घेता येत नसल्याने पेट्रोलचे दर चढे असल्याची टीका त्यांनी केली.

''पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून केंद्र सरकारला जबाबदार धरणाऱ्या राज्य सरकारने पेट्रोलवर जवळपास ३२ रूपये कर लावला आहे. हा कर कमी केला तर राज्यात पेट्रोल वीस रूपयांनी कमी होऊ शकते. वस्तू व सेवा करात (जीएसटी) पेट्रोल-डिझेलचा समावेश केला तर दरात आणखी कपात होऊ शकते. मात्र, केंद्राला जबाबदार धरणारे राज्य सरकार पेट्रोल-डिझेलचा जीएसटीत समावेश करण्यास विरोध करीत आहे.''

पेट्रोलवर लावण्यात आलेल्या करातून केंद्राला लिटरला जवळपास ३२ रूपये तर राज्यालाही जवळपास तितकाच कर मिळतो. केंद्राच्या करातून रस्ते विकास, शेतकऱ्यांना अनुदान तसेच पंचवार्षिक योजनातील तरतुदीनुसार राज्यांना निधी दिला जातो. राज्य सरकारने लावलेला कर कमी करता येऊ शकतो. मात्र, त्यासाठी राज्यसरकारची इच्छाशक्ती आवश्‍यक आहे, असे मुनगंटिवार यांनी सांगितले. मी अर्थमंत्री असताना वाढलेले भाव कमी करण्यासाठी राज्यात पेट्रोलचे दर लिटरला पाच रूपयांनी कमी केले होते. त्यासाठी नियोजन, अभ्यास आणि इच्छाशक्तीची गरज असल्याचे मुनगंटिवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT