विश्लेषण

अयोध्या निर्णयाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आव्हान देणार

सरकारनामा ब्युरो

लखनौ : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणी जो निकाल दिला त्या निकालाविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायलयाने नुकताच दिला. या प्रकरणातील एका बाबरी मशिदीच्या बाजुने याचिका करणारे इक्‍बाल अन्सारी यांनी यापूर्वीच आपण या निर्णयाला आव्हान देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. बोर्डाच्या आजच्या बैठकीला ते उपस्तित नव्हते. 

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या लखनौ येथे तीन तासापेक्षा जास्त काळ झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. जमियत उलेमा हिंद चे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी बैठकीनंतर सांगितले न्यायालयाच्या निर्णयाला आम्ही आव्हान देणार आहोत. ते म्हणाले की आम्हाला माहित आहे की आमची फेरविचार याचिका फेटाळाली जाणार आहे. मात्र अशी याचिका दाखल करणे हा आमचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही बजावणार आहोत. या बैठकीला देशभरातून मुस्लिम नेते आले होते. असदुद्दीन ओवेसीसह विविध संघटनांचे नेते यावेळी उपस्थित होते. सुन्नी वक्‍फ बोर्डाचे अध्यक्ष जफर फारुकी यांनी मात्र न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात अपील करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT