विश्लेषण

आशीष देशमुखांना सावनेरचे स्वप्न?

भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी भाजपशी असलेली नाराजी लपून राहिलेली नसून गेल्या तीन वर्षांपूर्वी जुळलेले नाते आता तुटल्यात जमा आहे. काँग्रेसमध्ये येऊन ते सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते.

सररकारनामा ब्युरो

नागपूर : भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी भाजपशी असलेली नाराजी लपून राहिलेली नसून गेल्या तीन वर्षांपूर्वी जुळलेले नाते आता तुटल्यात जमा आहे. काँग्रेसमध्ये येऊन ते सावनेर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते.

त्यांनी आता थेट भाजपवर हल्ला करणे सुरू केले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे सुपुत्र असलेले आशीष देशमुख यांचे संपूर्ण कुटुंब काँग्रेसविचारसरणीचे राहिले आहे. दीड-दोन वर्षांनंतर त्यांचा भाजपमध्ये भ्रमनिरास व्हायला सुरूवात झाली. भाजपच्या कार्यक्रमांना जाणेही त्यांनी बंद केले. हा दुरावा गेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळात अधिक वाढला.

आशीष देशमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या अभ्यास वर्गाला हजेरी न लावल्याने भाजपने नोटीस बजावली. ही बाब त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. या नोटीसचे त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. त्यामुळे भाजपच्या या नोटीसला आपल्या लेखी किंमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हापासून त्यांनी भाजपपासून दूर होण्याचा निर्णय घेतला.

आता मतदारसंघात फिरताना ते भाजपच्या कार्यकर्त्यांनाही सोबत घेत नाहीत. भाजपचे निष्ठावान कार्यकर्तेही त्यांच्यापासून अंतर राखूनच आहेत. यामुळे आशीष देशमुखांनी भाजपशी नाते तोडल्याचे स्पष्ट संकेत भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मिळाले आहेत. आशीष देशमुख यांचा सध्याचा मतदारसंघ हा काटोल आहे. याच मतदारसंघातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. अनिल देशमुख हे त्यांचे काका आहेत. काटोल सोडून आशीष देशमुख सावनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते.

काँग्रेसचे सुनील केदार सावनेरचे आमदार आहेत. केदार हे देशमुख यांचे परंपरागत विरोधक म्हणून ओळखले जातात. सुनील केदार यांचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चांगले संबंध नाहीत. याचा फायदा उचलून सावनेरची उमेदवार आशीष देशमुख यांनी मिळविण्याचे प्रयत्न चालविले आहे. रणजित देशमुख यांनी या मतदारसंघाचे 1985 ते 1995 पर्यंत नेतृत्व केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT