Padvi-Patil-Gavit.
Padvi-Patil-Gavit. 
विश्लेषण

नंदुरबार कॉंग्रेसचे के. सी. पाडवी, गावित, पाटील भाजपच्या वाटेवर

बळवंत बोरसे

नंदुरबार :  कॉंग्रेसचे माजी मंत्री माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावित यांचा भाजप प्रवेश निश्‍चित झाला असून त्यानंतरही जिल्ह्यातील काँग्रेसचे दिगग्ज नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

 विधानसभा व जिल्हा परिषदेच्यानिवडणुकीपूवीर् काँग्रेसचे सलग आमदार म्हणून निवडून येणारे धडगावचे के. सी.पाडवी, तसेच सहकार क्षेत्रातील मोठं वलय असलेले सहकार महषीर् अण्णासाहेब पी.के.पाटील यांचे वारसदार व सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पटेल आणि कॉंग्रेसचे जिल्हा स्तरावरील युवा नेतृत्व राम रघुवंशी किंवा त्यांच्या मातोश्री रत्ना रघुवंशी यांचा भाजप प्रवेश निश्चित समजला जात आहे. 

काँग्रेसचे हे सर्व दिगग्ज नेते उत्तर महाराष्ट्र्रातील माजी मंत्र्याच्या संपर्कात असून त्यांच्या माध्यमातून भाजपात प्रवेशाबाबत हालचाली सुरू आहेत. यापूर्वी भरत गावित व दीपक पाटील यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली आहे अर्थात दीपक पाटील यांनी तूर्तास तसा निर्णय नसल्याचे प्रसिद्धी माध्यमास सांगितले असले तरी तूर्तास नाही याचा अर्थ नंतर निर्णय होऊ शकतो असाच काढला जात आहे. 

आगामी काळात भाजप प्रवेश होणार असून याबाबत उत्तर महाराष्ट्राचे भाजपचे माजी मंत्री व दिग्गज नेत्यांनी हा खुलासा केला. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष धुळे जिल्हा असताना देखील नवापूर, नंदुरबार शहादा, अक्कलकुवा, धडगाव, तळोदा काहीं अपवाद वगळता हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला होता. 

आजदेखील जिल्हा परिषद, नंदुरबार,नवापूर नगरपालिकेवरकॉंग्रेसची सत्ता आहे. मधल्या काळात डॉ. विजयकुमार गावित यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या सत्तेला सुरूंग लावला, मात्र डॉ. गावित भाजपमध्ये गेल्यानंतर राष्ट्रवादीची राजकीय ताकद कमजोर झाली. 

मागील दोन पंचवार्षिकला लोकसभेत झालेला पराभव तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेत देखील भाजपच्या उमेदवाराला मतदारांनी प्रथम पसंती दिल्याने येणाऱ्या काळात काँग्रेसची सत्ता येईल किंवा नाही याबद्दल काँग्रेसच्याच काही दिग्गजांच्या मनात शंका आहे. शिवाय राज्यपातळीवरील कॉंग्रेसचे अनेक नेते भाजपमध्ये जात असल्याने आपण तरी कशाला पाच वर्षे  वाट'पहायची असा या नेत्यांचा मनसुबा आहे. 

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील भाजप-शिवसेनेसाठी पोषक वातावरण असल्याने काँग्रेसच्या बाजूने जंनमत कौल मिळेल का याविषयी अंदाज घेत पावले उचलेली जात आहेत. काँग्रेसचे संघटनेत असलेले मतभेद गटबाजी भाजपशी असलेले छुपे संधान यामुळे काँग्रेसमध्ये नेत्यांच्या आपसात ताळमेळ दिसून येत नाही. 

काँग्रेसच्या चिन्हावर निवडून येऊन देखील सत्तेत राहू का ? असा प्रश्न काँग्रेसच्या काही नेत्यांना पडला आहे. नंदुरबार जिल्ह्यात या दिग्गजांचे स्वतःचे अस्तित्व असून स्वतःच्या बळावर निवडून येण्याची क्षमता आहे, राज्यात सत्ता परत बसेल का याचा अंदाज बांधून आपली पुढील राजकीय वाटचाल सुकर करण्यासाठी सत्ताधारी पक्षात सामील होऊन आपलं राजकीय अस्तित्व पुढील काळात अधिक मजबूत करण्यासाठी भाजपाकडे जाण्याचा कल दिसून येत आहे. 

भरत गावित यांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती व त्यांनी देखील भाजपाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तळोद्याचे माजी आमदार ,क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या देखील नावाची चर्चा होती मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वीच नकार देत त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. आता वरिष्ठ पातळीवरून वळवी यांना भाजपा खेचण्यासाठी अजूनही पक्षश्रेष्ठींच्या प्रयत्न सुरू असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT