विश्लेषण

नंदुरबारमध्ये एमआयएमच्या सभेदरम्यान हाणामारी

सरकारनामा ब्युरो

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात एमआयएमच्या सभेदरम्यान हाणारीमारी झाली असून यात दोन जण जखमी झाले आहेत. 

जिल्हयात नगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाला घवघवीत यश मिळालं होतं. त्यांचे चार नगरसेवक निवडून आले होते.. त्यानंतर काल रात्री शहरातील गरीब नवाज कॉलनी परिसरात प्रदेश अध्यक्ष आणि काही नेत्याचा उपस्थित सभा झाली. या सभेत काही कार्यकर्त्यामध्ये वाद झाला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी सुरू झाली. यात फरीद पठाण गंभीर जखमी आहे, तर समीर शेख हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शहादा इथल्या एका खाजगी रुग्णायत उपचार सुरू आहेत. दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होत. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव कमी झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT