Narayan_Rane
Narayan_Rane 
विश्लेषण

 पूरस्थितीमुळे विधानसभा निवडणुक पुढे ढकलावी : नारायण राणे 

तुषार सावंत

कणकवली:  तूर्तास विधानसभा लढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. पूरस्थितीचा विचार करून शासनाने आगामी निवडणुका पुढे ढकलाव्या, असे माझे मत असल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पडवे (ता.कुडाळ) येथे आज घेतलेल्या पत्रकार परीषदेत सांगितले.

यावेळी श्री. राणे यांनी सिंधुदुर्गातील पूरस्थिती हाताळण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि जिल्हा प्रशासन कमी पडल्याची टिका केली. श्री. राणे कुडाळमधून विधानसभा निवडणुक लढवतील, अशी चर्चा आहे. याबाबतच्या प्रश्‍नावर ते म्हणाले, “पक्षाच्या हितासाठी कोणताही निर्णय घेतला जाईल. सध्या तरी निवडणूक लढण्याचा कोणता विचार नाही. मला पक्ष चालवायचा आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेईल.”

ते पुढे म्हणाले, “राज्यातील  पूर परिस्थितीचा विचार करून सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विचार करावा असे मत श्री. राणे यांनी व्यक्त केले. राज्याच्या विविध भागांमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थिती नंतर जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी किमान दोन महिन्याचा तरी कालावधी लागणार आहे. "

" राज्याच्या निवडणुकीचा कालावधी हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये असणार आहे. यावेळीही पाऊस असण्याची शक्यता नाकारता येत नाही; मात्र पहिल्या टप्प्यात विस्थापित झालेल्या जनतेच्या पुनर्वसनाबाबत प्राधान्य देऊन नंतर राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत विचारविनिमय व्हावा. शक्यतो या निवडणुका पुढे ढकलणे योग्य ठरेल.”

श्री. राणे म्हणाले, “सिंधुदुर्गात गेल्या आठ महिन्यात जिल्हा नियोजनची बैठक झालेली नाही. आता तर चार वेळा तारखा आणि वेळेत बदल करण्यात आला. जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीनंतर बाधित लोकांना मदत करण्यात पालकमंत्री दीपक केसरकर आणि त्यांचे प्रशासन कमी पडले. त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. येत्या काळात जिल्ह्यातील पूरग्रस्तांना योग्य मदत कार्य न मिळाल्यास महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष तीव्र आंदोलन छेडेल.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT