Narendra Modi
Narendra Modi 
विश्लेषण

सात जणांच जाणं मोदींच्या मनाला चटका लावून गेलं; पाच लाखांची नुकसान भरपाई जाहीर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : बेळगावमध्ये (Belagavi) घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाला असून, त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. दरम्यान, कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांनीही मृतांच्या कुटुंबीयांनी पाच लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील बडला अंकलगी गावात ६ ऑक्टोबरला दुर्घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून ही घटना घडली. यात दोन लहान मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला होता. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तातडीने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. आता पंतप्रधान कार्यालयानेही नुकसान भरपाई जाहीर केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर म्हटले आहे की, बेळगावमध्ये घर कोसळल्याने जिवितहानी अतिशय दु:खदायक आहे. मृताच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येईल.

दरम्यान, जगातील सर्व घडामोडींवर ट्विट करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखीमपूर खीरीत शेतकऱ्यांना चिरडण्यात आल्याच्या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात एवढा मोठा हिंसाचार होऊनही मोदींनी एकही ट्विट केलेले नाही. दरम्यान, मोदी हे ५ ऑक्टोबरला लखनौमध्ये गेले होते. तेथून केवळ 3 तासांच्या अंतरावर लखीमपूर खीरी आहे. परंतु, मोदींनी लखीमपूर खीरीला भेट तर दिली नाही. याचबरोबर या कार्यक्रमात एकदाही लखीमपूर खीरीतील घटना आणि मृत शेतकऱ्यांबद्दल साधा उल्लेखही मोदींनी केला नाही.

लखीमपूर खीरीतील घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. तरीही भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. विधानसभा निवडणुका तोंडावर असलेल्या उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे भाजप नेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीत पक्षाला बसण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप प्रवक्त्यांपासून बडे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT