narendra modi inquires about lalu prasad yadav health
narendra modi inquires about lalu prasad yadav health 
विश्लेषण

लालूजी कसे आहेत? तेजस्वींसोबत गप्पांमध्ये मोदीजी रमले

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जातीवर आधारित जनगणनेच्या (Caste Census) मुदद्यावर बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यासह आज 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. या वेळी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हेसुद्धा उपस्थित होते. या वेळी मोदींनी आवर्जून आरजेडीचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करुन ते त्यांच्या आठवणींमध्ये रमले. 

मोदींना भेटण्यास शिष्टमंडळ गेल्यानंतर त्यांनी मूळ मुद्दा सोडून थेट तेजस्वी यादव यांच्याशी गप्पा मारण्यास सुरवात केली. त्यांनी तेजस्वी यांचे पिता लालूप्रसाद यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली. यामुळे शिष्टमंडळातील सर्वच नेत्यांना धक्का बसला. तेजस्वी यांनी पित्याच्या प्रकृतीबद्दल सविस्तर माहिती मोदींना दिली. मोदींनी लालू लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी सदिच्छा व्यक्त केली. यानंतर मोदींनी शिष्टमंडळाकडून त्यांचा जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा ऐकून घेतला. 

लालूप्रसाद यादव (वय 73) हे बरेच दिवस रुग्णालयात दाखल होते. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. चारा गैरव्यवहार प्रकरणी ते शिक्षा भोगत आहेत. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. कारागृहात असताना त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. लालूंना हृदयविकार आणि मूत्रपिंडविकाराचा त्रास आहे. 

नितीशकुमार यांच्यासोबत 10 पक्षांच्या शिष्टमंडळाने आज मोदींची भेट घेतली. या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, भाजपचे जनकराम, काँग्रेस नेते अजित शर्मा, हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जितनराम मांझी आणि डाव्या पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. या शिष्टमंडळाच्या मागणीवर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन मोदींनी दिले आहे. आता बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. 

मोदींची भेट झाल्यानंतर तेजस्वी यादव म्हणाले की, आमच्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान मोदींची भेट घेतली. जातीनिहाय जनगणनेची बिहार राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी महत्वाची आहे. प्राणी आणि पक्ष्यांची गणना होऊ शकते तर लोकांचीही गणना होऊ शकते. जातीनिहाय जनगणना ही ऐतिहासिक आणि गरीबांना हात देणारी ठरेल. आता आम्हाला मोदींच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची भीती केंद्राला वाटत असेल. तर सरकारने धर्माच्या आधारावर माहिती गोळा करणेही थांबवावे. जनगणनेच्या अर्जावर धर्म आणि एससी/एसटी हे रकाने असतात. जातीनिहाय जनगणनेसाठी त्यात केवळ जातीचा एक कॉलम अतिरिक्त टाकावा लागेल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT