Sameer Wankhede, Nawab Malik sarkarnama
विश्लेषण

नवाब मलिकही आज झोपणार नाहीत आणि वानखेडेंनाही जागे ठेवणार!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी 21 ऑक्टोबर रोजी दिवसभर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना टार्गेट केले. वानखेडे यांच्या भगिनी यास्मिन यांनाही त्यांनी धारेवर धरले. वानखेडे यांच्या आईवडिलांबद्दलही अपशब्द वापरले. यास्मिन आणि समीर या दोघांनीही मलिक यांचे आरोप खोटे असल्याचे सांगत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतरही मलिकांनी दुसरा आरोप करण्याची मालिका सुरूच ठेवली.

मलिक यांचा पहिला आरोप हा वानखेडे हे कुटुंबासह मालदिव आणि दुबईला गेले होते. तेथ त्यांनी बाॅलिवूडमधील काही मंडळींकडून खंडणी उकळल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. त्याला वानखेडे बंधू-भगिनींनी उत्तर देत आम्ही मालदिवला गेलो होतो हे मान्य केले. वानखेडे यांनी ऑफिसची मान्यता घेऊन दौऱ्यावर गेल्याचे सांगितले. वानखेडे यांच्या पाठिंब्यासाठी मनसे पुढे आली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी मलिक यांचे डोके ठिकाणावर नसल्याचे सांगत या वादात उडी घेतली. वानखेडे यांची नोकरी जाणार आणि वर्षभराच्या आत त्यांना तुरुंगवास घडणार असल्याचे सांगत मलिक यांनी खळबळ उडवून दिली. त्याला तुरुंगात पाठविल्याशिवाय मी गप्पा राहणार नसल्याचे सांगत त्यांनी आणखी आगीत तेल ओतले.

Wankhede in Dubai claims Malik
Wankhede in Dubai claims Malik
Jasmeen Wankhede in Maldives claims Malik
Jasmeen Wankhede in Maldives claims Malik

दुपारी मलिक हे वडगाव मावळ येथील कार्यक्रमात आणखी आक्रमकपणे बोलले आणि वानखेडे यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला. त्यानंतर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत मलिक यांच्या विधानांचा निषेध केला. मी माझे काम प्रामाणिकपणे करत असल्याचे सांगत मलिक यांच्या नातेवाईकाला अटक केली म्हणून ते मला टार्गेट करत असल्याचा दावा केला. तसेच आपण दुबईला गेलो नसल्याचे सांगितले. मुलांना घेऊन कोणी खंडणी मागण्यासाठी जाते का, असा सवाल करत मलिक यांचे आरोप खोटे असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले.

एकूणच या दोघांतील आरोप-प्रत्यारोपांच्या बातम्यांमुळे आज दिवसभर `एनसीबी`चर्चेत राहिले. त्यात शाहरूऱखान याच्या मन्नत बंगल्यावर काही अधिकारी गेले. त्यावरूनही बरीच टीकाटिप्पणी झाली. अभिनेता चंकी पांडे याची मुलगी अनन्या हिला एनसीबीने चौकशीसाठी नेले. शाहरूखखान हा आपला मुलगा आर्यन याला तुरुंगात जाऊन भेटला. अशा साऱ्या घडामोडी आज दिवसभर घडल्या. हा वाद पुढे काय वळण घेणार, याकडे आता लक्ष आहे. मलिक यांनी आपल्या आरोपापासून अजिबात ढळले नाहीत. उलट आज दिवसभर सातत्याने काही नवीन बाबी सांगत राहिले. त्याला वानखेडे आणि त्यांचे कुटुंबिय प्रत्युत्तर देत राहिले. त्यामुळे मलिक हे आणखी काही नवे आरोप करून वानखेडेंची झोप उडविणार का, याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT