Prasad Lad, Pravin Darekar Sarkarnama
विश्लेषण

`भाजपवर वार केलाच पण सेनेच्या पाठीतही राष्ट्रवादीने खंजीर खुपसला`

मुंबै बॅंकेची (Mumbai Bank) सत्ता आपल्या हातून जाईल, याचा अंदाज दरेकर-लाड जोडीला आलाच नाही

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबै बॅंकेच्या (Mumbai Bank) अध्यक्षपदाच्या निवडीत अनेक नाट्यपूर्ण घडामोडी घडत भाजपचे उमेदवार आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांचा पराभव महाविकास आघाडीने केला. येथे राष्ट्रवादीचे सिद्धार्थ कांबळे हे सेना आणि राष्ट्रवादीच्या मतांवर अध्यक्ष झाले. मात्र उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अभिषेक घोसाळकर यांना मात्र चिठ्ठीवर पराभूत व्हावे लागले. येथे राष्ट्रवादीने शिवसेनेला साथ दिली नसल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला. त्यांनी या साऱ्या घडामोडींचे वर्णन एका वाक्यात केले.

त्यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलाच आणि पण शिवसेनेच्या पाठीतही तो खुपसला आहे. दरेकर यांची या बॅंकेवरील सत्ता संपुष्टात आली आहे. याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की मुंबै बँकचे सहकार पॅनेल आम्ही एकत्र निवडणूक लढून जिंकलो. पदाधिकारी निवडायचे ठरले तेव्हा त्यांनी महाविकास आघाडी म्हणून भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्याने आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. राष्ट्रवादीने आपला अध्यक्ष निवडून आमच्यावर वार केला. पण त्यांनी शिवसेनेच्या पाठीतही खंजीर खुपसला. महाविकास आघाडीचा अध्यक्ष निवडून आला मग उपाध्यक्षही व्हायला हवा होता. ते शिवसेनेला अध्यक्षपद देऊ शकले नाहीत. उपाध्यक्षपद काय देणार, असा सवालही त्यांनी विचारला. दगाफटका कोणी केला शिवसेनेचने शोधावे. मांडीला मांडी लावून बसायचे आणि मित्राच्या पाठीत खंजीर खुपसायचा, असा खेळ सुरू आहे, अशा शब्दांत दरेकर यांनी त्रागा व्यक्त केला.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एक मत फुटल्याचे दरेकर यांनी मान्य केले. तसेच दरेकर दोन मतदारसंघांतून निवडून आले. त्यातील मजूर मतदारसंघातील जागेचा त्यांनी राजीनाा दिला. त्यामुळे भाजपचे एक मत कमी झाले. दरेकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असल्याने त्यांच्याऐवजी प्रसाद लाड यांना भाजपने संधी दिली. लाड हे आपल्या नेहमीच्या पद्धतीने विजय मिळवून आणतील, असे अनेकांना वाटत होते. मात्र आज दुपारी चक्रे फिरली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्य़टनमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेऊन रणनीती ठरवली. त्यात भाजपला अध्यक्षपदी संधी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. तरी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या घोसाळकर यांचा पराभव कसा झाला, याचा आता शोध घेतला जात आहे. घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांना समसमान म्हणजे प्रत्येकी दहा मते मिळाली. चिठ्ठीवर भोसले अध्यक्ष झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या कांबळे यांना 11 मते मिळाली होती. मग घोसाळकर यांनाच एक मत कसे कमी पडले, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT