ncp leader jayant patil says bjp leaders soon join mva alliance parties
ncp leader jayant patil says bjp leaders soon join mva alliance parties 
विश्लेषण

मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची लवकरच 'घरवापसी'

सरकारनामा ब्युरो

अकोला : विधानसभा निवडणुकीपूर्वी जे नेते भाजपमध्ये गेले होते, त्यांची तिथे मुस्कटदाबी होत आहे. याशिवाय इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे दिल्याने भाजपमधील एक वर्ग चिडलेला आहे. ते सर्व नेते महाविकास आघाडीतील पक्षांच्या संपर्कात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील हे  अकोला जिल्हा दौऱ्यावर होते. शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विप्लव बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर आदी उपस्थित होते. 

मी पुन्हा येणार म्हणणाऱ्या नेत्यांना विरोधात बसावे लागले हे अद्यापही पचनी पडलेले नाही. त्यामुळे प्रलोभने दाखवून व्याभिचार करीत सत्तेत येण्याचा या ना त्या मार्गाने भाजपचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी पक्ष अडचणीत असल्याने महाविकास आघाडीविरुद्ध वेगवगेळा अपप्रचार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सुरुवातीला कामकाजाचे जे तीन-चार महिने मिळाले त्यात या सरकारने धाडसी व जोखमीचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. कोरोना संकटकाळानंतर आता स्थिती पूर्वपदावर येत आहे. पुन्हा एकदा हे सरकार ज्या विकासाचे स्वप्न घेवून काम करीत होते त्याला गती येईल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

भाजपकडून सरकारच्या कारभाराबाबत गेली वर्षभर अपप्रचार सुरू आहे. दोन-तीन महिन्यांत आम्ही सत्तेत येऊ असे ते गेले वर्षभर सातत्याने सांगत आहे. विरोधकांचा अपप्रचार सुरू असला तरी महाविकास आघाडी सरकारने वर्ष पूर्ण केले, असे पाटील यांनी सांगितले.  

एसएससीईटी मुदतवाढीला स्थगिती
कामगार संघटनांच्या मागणीनुसास एसएससीईटीला मुदतवाढ देण्याचा आदेश निवडणूक काळात काढण्याचा प्रयत्न झाला. या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, सरकारला अडचणीत आणण्यासाठी अशा प्रकारचे फाईल पुटअप करणाऱ्या झारीतील शुक्राचारांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते कुणाच्या सांगण्यावरून हे काम करताहेत हेही शोधले जाईल, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT