NCP leader Nawab Malik
NCP leader Nawab Malik Sarkarnama
विश्लेषण

मलिक निघाले थेट दुबईला! केंद्रीय तपास यंत्रणांना दिलं खुलं आव्हान

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drug Case) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोपांचा भडिमार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) थेट दुबईला (Dubai) चालले आहे. मात्र, नेमक्या कोणत्या कारणासाठी दुबई दौऱ्यावर निघाले आहेत, याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही. सर्व तपास यंत्रणांना मात्र त्यांनी आपल्यावर लक्ष खुलं आव्हान दिलं आहे.

नवाब मलिक यांच्याकडून वानखेडेंवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. खंडणी वसुलीसह बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणे, षडयंत्र रचून आर्यन खानला अडकवणे, ड्रग्ज माफियांशी संबंध असे अनेक आरोप मलिकांनी केले आहेत. तसेच बॉलीवूडमधील अभिनेते व अभिनेत्रींकडून कोट्यवधी रुपयांची वसूली केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. ही वसुली दुबई, मालदीवमध्ये झाल्याचेही मलिकांनी म्हटले आहे.

वानखेडेंविषयी दररोज नवनवी माहिती पुरवणारे मलिक आता थेट दुबईला निघाले आहेत. वानखेडे यांच्या दुबई दौऱ्यावर सतत बोट ठेवणारे मलिकच आता दुबईला निघाल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. त्यांनी याबाबत एक ट्विट करून माहिती दिली आहे. मलिक म्हणतात, मी दुबईला जात आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत. मी 24 नोव्हेंबरला भारतात परत येईन. सर्व सरकारी यंत्रणांनी माझ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवावी, असं विनंतीवजा आव्हानच मलिकांनी तपास यंत्रणांना दिलं आहे.

मलिकांनी आपल्या ट्विटमध्ये ते कोणत्या कारणासाठी दुबईला निघाले आहेत, याबाबत खुलासा केलेला नाही. मात्र, हा शासकीय दौरा असल्याचे समजते. पण मलिकांच्या या दौऱ्यामुळे आता अनेक तर्क लावले जाऊ लागले आहेत. दुबई जाऊन मलिक वानखेडेंशी संबंधित आणखी काही माहिती जमा करणार का, असाही तर्क लावला जात आहे. दुबईतून परत आल्यानंतर ते कोणता बॉम्ब टाकणार, याबाबतही उत्सुकता लागली आहे.

दरम्यान, मलिकांनी शुक्रवारी समीर वानखेडे यांच्या नावावर वाशी येते बार असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 18 वर्षे पूर्ण नसतानाही त्यांच्या नावावर बारचा परवाना घेण्यात आला. शासकीय सेवेत असताना दुसरा व्यवसाय करता येत नाही, हा नियमांचा भंग आहे. त्यामुळे आतातरी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT