विश्लेषण

शरद पवारांचे आता 'मिशन विधानसभा'

सरकारनामा ब्युरो

मुंबई :  लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान संपल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळत आहे. शरद पवार यांनी ४ मे रोजी मुंबईत पक्षाची बैठक बोलावली आहे.

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपत नाही तोच राजकीय पक्षांनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत पक्षाच्या आमदार आणि जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT