Jayant Patil, Rohit Pawar
Jayant Patil, Rohit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Rohit Pawar Vs Jayant Patil : 'सेनापती'वरुन वादाची ठिणगी? जयंत पाटील अन् रोहित पवार नेमके काय म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 80 टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने घवघवीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात श्रेयवाद सुरू झाला आहे. यावरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू झाल्याची चर्चा आहे. मात्र पक्षांतर्गत एकमेकांविरोधात बोलता येते, हेच लोकशाही असल्याचे सांगून खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीतील विजयोत्सव आणि पक्षाचा रौप्यमोहोत्सव नगरमध्ये साजरा केला. यावेळी रोहित पवारांनी Rohit Pawar या विजयाला कोणी एक शिल्पकार नसल्याचे ठासून सांगत जयंत पाटलांना टोला लगावला. तर त्यास उत्तर देताना पाटलांनीही काही तक्रार असेल तर पावरसांहेबाना जाऊन सांगा, असा सल्ला नाव न घेता रोहित पवारांना दिला. त्यामुळे पक्षाचा सेनापती कोण, यावरून शरद पवार गटात शीतयुद्ध सुरू झाल्याचे बोलले जाते.

लोकसभेत 10 पैकी 8 जागा जिंकल्यानंतर शरद पवार गटाकडून पुण्यात 'सेनापती' जयंत पाटील असे बॅनर झळकले आहेत. मात्र जनता हीच सेनापती असून कोणी एक सेनापती होऊ शकत नाही, असे वक्तव्य रोहित पवारांनी जाहीर सभेत केले. ते म्हणाले, या यशानंतर मी म्हणू शकतो की मीच किंगमेकर, सेनापती आहे. मात्र हे काम एक-दोन सेनापतीचे नव्हते. महाराष्ट्रातील सामान्य कार्यकर्त्यांमुळे हे यश मिळाले आहे. कोणी एकामुळे हे यश मिळालेले नाही.

रोहित पवारांना त्याच स्टेजवरून उत्तर देताना जयंत पाटील Jayant Patil म्हणाले, मी पक्षाचा अध्यक्ष आहे. यापूर्वी अनेकांकडून माझ्या प्रदेशाध्यक्ष पदाचे दिवस मोजून झालेले आहेत. आता चार महिने दिवस मोजू नका. मी करतो व्यवस्थित. तसेच जाहीर ट्विटरवर बोलायचे बंद करा. काय तक्रार असेल तर शरद पवारांकडे करा. ते काय करतील तो त्यांचा निर्णय. पण जाहीर बोलू नका. पक्ष हा राज्यातील लाखो लोकांची संपत्ती आहे. कुणा एकाची नाही, असा टोलाही पाटलांनी रोहित यांना लगावला.

सेनापतीवरून सुरू झालेल्या या सुप्त वादावर खासदार सुळेंनी पक्षात लोकशाही जीवंत असल्यानेच उघडपणे बोलू शकतात, याकडे लक्ष वेधत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र विजयोत्सव सभेच्या स्टेजवरच झालेल्या 'सनेपाती'बाबत जाहीर वक्तव्यांमुळे पक्षात धुसफूस सुरू झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जयंत पाटलांनी नोव्हेंबरपर्यंत मीच नमस्कार करेन, असेही स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT