ncp youth state president Mahebub Shaikh criticises Waris Pathan
ncp youth state president Mahebub Shaikh criticises Waris Pathan 
विश्लेषण

`... तर वारिस पठाण यांच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती'

सरकारनामा ब्युरो

पुणे - देशातील १५ कोटी मुस्लिम वारिस पठाण यांच्या विचारांचे असते तर पठाण यांच्यावर माजी आमदार होण्याची वेळ आली नसती, अशी टीका युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आज केली आहे. 

वारीस पठाण यांनी बंगळूरमधील सभेत बोलताना `आम्ही पंधरा कोटी संभर कोटींना भारी आहोत,' असे वक्तव्य केले होते. पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करीत मेहबूब शेख यांनी टीका केली आहे. 

शेख यांनी शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये म्हटले आहे, की आरएसएसच्या सांगण्यावरून हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा एमआयएम पक्ष प्रयत्न करतोय. भाजपाची बी टीम म्हणून पक्ष काम करतोय, हे मुस्लिम समाज जाणतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT