Relief to Ajit Pawar as Govenrment Closes Nine Files in Irrigation Scam
Relief to Ajit Pawar as Govenrment Closes Nine Files in Irrigation Scam 
विश्लेषण

अजित पवारांना दिलासा? सिंचन घोटाळ्याच्या नऊ फाईली बंद

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ज्या प्रकरणाचा आरोप होता त्या सिंचन घोटाळ्यातील नऊ फाईली बंद करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला आहे. शनिवारीच अजित पवार यानी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात चर्चेच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र, त्यातून काहीच समोर येत नव्हते. त्यातच अचानक अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादी काँग्रेसला झटका दिला. अजित पवारांवर दबाव आणून त्यांना आपल्याकडे वळवल्याचा आरोप शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी त्यानंतर केला होता. आता त्यातच अजित पवार यांची फाईल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बंद केल्याची माहिती मिळत आहे. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या पाटबंधारे प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांबाबत चौकशी सुरु आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सिंचन क्षेत्रात सुमारे ३५ हजार कोटी रुपये खर्चाबाबत अनियमितता पुढे आल्याने खळबळ उडाली होती.

यापैकी नऊ फाईली 'नस्तीबंद' करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने काही आदेश दिल्यास त्याच्या अधीन राहून या फाईली बंद करण्याचा हा निर्णय आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी बाबतचे पत्र अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिक्षकांना पाठवले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT