विश्लेषण

राष्ट्रगीत सुरू असताना केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांना आली भोवळ

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त  केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज आले होते.  कार्यक्रमाच्या समारोपानंतर राष्ट्रगीत सुरू असताना केंद्रीय मंत्री गडकरी यांना अचानक भोवळ आली. 

केंद्रीय मंत्री गडकरी काही सेकंदांसाठी खाली बसले.  राष्ट्रगीत सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात येतात ते पुन्हा उठून उभे राहिले. राष्ट्रगीत संपल्यानंतर उपस्थित डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात राहुरी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असताना चक्कर आल्यानंतर गडकरी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT