Eknath Khadse Vinod Tawde
Eknath Khadse Vinod Tawde 
विश्लेषण

भाजपची दुसरी यादी जाहीर खडसे तावडे बावनकुळे यांचा पत्ता कट

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमेदवार यादी आज रात्री साडे दहाच्या सुमारास जाहीर केली.  बारामतीतून गोपीचंद पडळकर आणि केस मधून मुंदडा यांना सत्तारूढ पक्षाने तिकीट दिले आहे त्याच वेळी विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांसह ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचेही नाव या यादीत नाही.उमेदवारी यादीतून संबंधितांना ' मेसेज” देऊन त्यांची तिकिटे कापण्याचा चहा निवडणुकीवेळी दिसलेला अमित शहा पॅटर्न विधानसभेच्या वेळीही दिसत आहे.

आज चौदा जणांची नावे जाहीर केल्याने भाजपने आता 139 शाळांची यादी जाहीर केली आहे उर्वरित सात उमेदवारांची नावे उद्या दुपारपर्यंत जाहीर होतील असा अंदाज आहे.
अक्षरशः दोन - 3 दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले  गोपीचंद पडळकर यांना बारामतीतून, नमिता मुंदडा यांना केज मधून तर गोपालदास अग्रवाल यांना गोंदीयातून तिकीट दिले आहे. 

विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये अक्षेप होता. त्याच प्रमाणे बावनकुळे यांच्या बाबत संघ परिवारातून काही तक्रारी आल्या होत्या. आपले तिकीट कापले जाणार याची कुणकुण लागल्यामुळेच बावनकुळे बुक समितीच्या बैठकीवेळी भाजप कार्यालयातही आले होते.  बैठक सुरू असताना ते बाहेर भाजप कार्यालय परिसरात बसले होते. खडसे यांनी मंत्रीपद गमवावे लागल्यावर मुख्यमंत्री आणि इतरांविरुद्ध जी विधाने केली याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT