raju_shetty
raju_shetty 
विश्लेषण

अद्याप सत्तेतील सहभागाबद्दल  प्रस्ताव  नाही : राजू शेट्टी

संपत मोरे

पुणे :  महाविकास आघाडीने अद्याप कोणत्याही घटक पक्षाला सत्तेतील सहभागाबद्दल कसलाही प्रस्ताव दिलेला नाही. जेव्हा त्यांच्याकडून प्रस्ताव येईल तेव्हा बघू. अजून त्यांनी आम्हाला प्रस्तावच दिलेला नाही, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी 'सरकारनामा'ला दिली.

राजू शेट्टी यांना सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरू आहे, त्यांना मंत्रिपद द्यावे अशी मागणीही होत आहे. कृषिमंत्री पदासाठी राजू शेट्टी यांच्या नावाची चर्चा आहे, त्याबाबत शेट्टी यांनी खुलासा केला.

"मी काल शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना भेटलो. या भेटी दरम्यान मी त्यांना सांगितले किमान समान कार्यक्रमातून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी आणि शेतीची वाढीव वीजबिल कमी व्हावीत.असे झाले तरच शेतकरी आपल्याला साथ देईल.त्यांना सरकारबद्दल आशावाद वाटेल.आता शेतकऱ्यांची नाराजी परवडणारी नाही,"असे शेट्टी म्हणाले.

"आम्हाला सत्तेत सहभागी करून घेण्याबाबतचा कोणताही प्रस्ताव आघाडीकडून आलेला नाही.कोणता प्रस्ताव येतोय तो अगोदर पाहू या.मग ठरवू", असे शेट्टी त्यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेबाबत म्हणाले.

"काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी  झालेल्या   कालच्या भेटीतही सत्तेतील सहभागाबाबत चर्चा झाली नाही." असेही ते म्हणाले .  माहिती शेट्टी यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT