No Progress in Balasaheb Thakrey Monument in Solapur
No Progress in Balasaheb Thakrey Monument in Solapur 
विश्लेषण

निधीअभावी बाळासाहेबांचे सोलापूरमधील स्मारक कागदावरच!

सरकारनामा ब्युरो

सोलापूर  : निधीअभावी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अद्याप कागदावरच आहे. निधीची तरतुद केली आहे; परंतु महापालिकेकडून कामाचे पैसे मिळत नसल्याने कोणताही ठेकेदार काम घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. शिवसेना सत्तेत आल्यास हा विषय पुढे जाईल, अन्यथा स्मारकाचा विषय अनेक वर्षे प्रलंबीत राहील, असे शिवसैनिकांना वाटतेय.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्याचा ठराव महाराष्ट्रात पहिल्यांदा सोलापुरात झाला. तेव्हा कॉंग्रेसमध्ये असलेल्या नगरसेवक महेश कोठे यांनी स्मारकाचा विषय महापालिकेत मांडला होता. पोलिस मुख्यालयाच्या समोरील जागेत स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी जागा देण्याचे महापालिकेने ठरविले.

"शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधीची खास तरतुद केली नाही, त्यामुळे हा अद्याप का विषय कागदावरच आहे'', असे शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक गणेश वानकर यांनी सांगितले. "भांडवली निधीतून हे काम होऊ शकत नाही. नुसता ठराव करून काम होत नाही. पूर्वीची बिले न मिळाल्याने कोणताही ठेकेदार हे काम घ्यायला तयार नाही. स्मारकाचे एकूण खर्च साडेपाच कोटींचे आहे. त्यासाठी तुटपूंजा निधी ठेऊन चालणार नाही. या विषयासाठी शिवसेनेला निवेदन द्यावे लागले, आंदोलन करावे लागले तरी हा विषय प्रलंबीतच आहे. आमचे सरकार आल्यास हा विषयी लवकरात लवकर पुढे जाईल'', असेही वानकर यांनी सांगितले.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी निधीची तरतुद महापालिकेने केली आहे. दोन-तीन वेळा निविदा काढली, पण कोणीच काम घ्यायला तयार नाही. हे काम महापालिकेचे असल्याने कोणी काम घेत नाही. याबाबत माझे पालकमंत्र्यांशीही बोलणे झाले होते, त्यांनी निधी देण्याचे मान्य केले होते. निवडणूकीमुळे हा विषय मागे पडला होता. शिवसेनेचे संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनाही बोललो होतो. हा विषय लवकरच पुढे जाईल.
- महेश कोठे,विरोधी पक्षनेते, महापालिका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT