विश्लेषण

वाईट प्रवृत्तीना विरोधच असेल - राजेनिंबाळकर

तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बडे नेते राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचे राजकीय विरोधक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आमदार पाटील यांना कायम विरोध राहणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपली भुमिका स्पष्ट केली आहे. 

"पक्ष नव्हे तर वाईट प्रवृत्तीसोबतचा संघर्ष चालुच राहील, काल, आज आणि उद्यासुध्दा. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत' अशी पोस्ट टाकुन त्यानी यापुढील राजकीय भूमिका काय असेल हे स्पष्ट केले आहे. राणा जगजितसिंह पाटील यांच्या भाजप प्रवेशाचे जाहीर झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार पाटील व श्री. राजेनिंबाळकर यांच्यामध्ये लढत झाली होती. त्यामध्ये आमदार पाटील यांचा पराभव करुन ओमराजे खासदार झाले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT