विश्लेषण

खुदा के लिये बाळासाहेब को समझाओ, हम आज भी तैयार : असदुद्दीन ओवेसी

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडी सोबत "एमआयएम'ची आघाडी तुटल्यानंतर आमचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहतील असे दोन्ही बांजुनी सांगितले जात होते. औरंगाबादेत आलेले एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना " खुदा के लिये बाळासाहेब को समझाआ े' अशी आर्जव करतांनाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालतोय. " आम्ही वंचित सोबत केवळ निवडणुकीसाठी आघाडी केली नव्हती, मी प्रामाणिकपणे बाळासाहेबांना खांद्यावर उचलून घेतले होते, आजही माझी त्यांना खांद्यावर उचलून घेण्याची तयारी असल्याचे ओवेसी यांनी यावेळी सांगितले. 

असदुद्दीन ओवेसी एमआयएम उमेदवारांच्या प्रचारा निमित्त औरंगाबादेत आले आहेत. बुधवारी आमखास मैदानावर ओवेसी यांची प्रचंड जाहीर सभा झाल्यानंतर, आज सकाळी एका हॉटेलमध्ये वंचितच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ओवेसी यांची भेट घेतली. यावेळी ओवेसी यांनी वंचित सोबत आपण आजच्या घडीला देखील आघाडी करायला तयार आहोत, बाळासाहेब आंबेडकरांना कुणी काय सांगितले हे मला माहित नाही, पण तुम्ही त्यांना समजवा अशी विनंती केली. 

ओवेसी म्हणाले, बाळासाहेबांना सत्य माहित नाही, ज्या मध्य विधानसभा मतदारसंघात आमचा विद्यमान आमदार आहे ती जागा आम्ही कशी सोडणार हे समजून घ्या. शहरात वंचितचा उमेदवार पाहिजे ही तुमची मागणी रास्त आहे, त्यासाठी पश्‍चिमची जागा आम्ही देऊ केली होती. यावरून खासदार इम्तियाज जलील माझ्याशी भांडले देखील, पण मी त्यांची समजूत काढली, म्हणालो नाही, आपल्याला वंचित सोबत आघाडी करायची आहे, पश्‍चिमची जागा द्यावी लागेल, अरुण बोर्डेला मी समजावतो. 

बाळासाहेबांना राज्यसभेवर पाठवता येईल.. 
एमआयएम-वंचित सोबत लढले तर दोन्ही पक्षाचे मिळून राज्यात किमान पंधरा आमदार निवडून येतील. इतरांचा पाठिंबा मिळवून आपण बाळासाहेब आंबेडकरांना राज्यसभेवर पाठवू शकतो. या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. मध्य मधून अमित भुईगळ यांना माघार घ्यायला लावा, त्याला समजवा, "दिल साफ रखो' अशी विनंती देखील ओवेसी यांनी वंचितच्या स्थानिक नेत्यांना केली आहे. विशेष म्हणजे हॉटेलात झालेल्या या चर्चेचा व्हिडिओ खासदार इम्तियाज जलील यांच्या फेकबुक पेजवर देखील व्हायरल करण्यात आला आहे. यावरून वंचित सोबत आघाडी करण्याचे प्रयत्न ओवेसी यांनी अजूनही सुरू ठेवले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT