NCP State President Jayant Patil
NCP State President Jayant Patil 
विश्लेषण

वर्षा बंगल्यावर पक्ष बदलाचा बाजार : जयंत पाटील

भारत नागणे

पंढरपूर :  ''राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात -बारा उताऱ्यावर ज्यांची नावे होती. ते सगळे आता पक्षासा सोडून पळून जाऊ लागले आहेत.  ज्या - ज्या लोकांनी सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि बॅंकांमध्ये घोटोळे केले आहेत,असे लोक चौकशीच्या भितीपोटी सेना- भाजपाच्या कळपात दाखल होऊ लागले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे,'' अशी  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केले.

मंगळवारी (ता.27) रात्री उशिरा शिवस्वराज्य यात्रा पंढरपुरात दाखल झाली.यावेळी यात्रेचं मोठ्या उत्साहाने स्वागत केले. त्यानंतर येथील शिवतिर्थावर झालेल्या जाहीर सभेत पाटील यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या आमदार आणि नेत्यांचा नामोल्लेख टाळून समाचार घेतला.यावेळी पाटील म्हणाले, ''पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक तळागाळातील कार्यकर्त्यांना मोठं केलं.अडचणीच्या काळात   मदत केली. असेच लोक आता पक्षाला सोडून पळून जाऊ लागले आहेत. जे पक्ष सोडून चालले आहेत,अशा काही  मंडळींनी साखर कारखान्यामध्ये घोटाळे केले आहेत. तर कुणी शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत म्हणून  तर काही जण ईडीच्या भितीने पक्ष सोडून चालले आहेत. कोणाच्या जाण्याने पक्षावर कोणताही परिणाम झाला नाही. उलट नवीन होतकरु कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे.''

मुख्यमंत्र्यांनीही निवडणुकीच्या तोंडावर वर्षाबंगल्यावर पक्ष बदलाचा बाजार मांडला आहे. साम,दाम,दंड भेद नितीचा वापर करुन भल्याभल्यांना त्यांनी वर्षा बंगल्यावर जाण्याची वेळ आणली असी टीकाही पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

''कर्ज माफी केली नाही तर सत्तेला लाथ मारु म्हणणारे उध्दव ठाकरे गेल्या पाच वर्षापासून गुळाला मुगळा कसा चिकटून बसतो तसं ते सत्तेला चिकटून बसले आहेत. खिशात राजीमाना घेवून फिरणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे आता याच चंद्रभागेच्या नदीत बुडवण्याची वेळ आली आहे,''अशी टीका ही  राष्ट्रवादीचे खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादीचे राजूबापू पाटील, अमोल मेटकरी, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा जयमाला गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शहर अध्यक्ष संदीप मांडवे,  सुधीर भोसले, दीपक पवार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT