विश्लेषण

शेतकऱ्यांनी ज्यांना पाडलं त्यांनी चिंता करावी - पाशा पटेल

प्रकाश बनकर

औरंगाबाद : मला माझ्या भविष्यांची चिंता नाही, मला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची चिंता आहे. मी निवडणुक लढवलो नाही, मला शेतकऱ्यांनी पडलंही नाही. ज्यांना शेतकऱ्यांनी पाडले. त्यांनी चिंता करावी असा टोला राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना लगावला. 
त्यांनी सरकारनामाशी संवाद साधला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा राजू शेट्टी म्हणाले होते, पाशा पटेल यांना स्वत:च्या भवितव्याची चिंता आहे. शेतकऱ्यांची चिंता नाही. या आरोपावर पाशा पटेल यांनी खरमरीत उत्तर दिले. पटेल म्हणाले, मला शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची चिंता आहे. 

हवामानातील बदल आणि ढगफुटी आणि दुष्काळ यांचा मी अभ्यास करत आहे. यामूळे माझी चिंता करण्याऐवजी शेतकऱ्यांनी का पाडलं याची चिंता राजू शेट्टी यांनी करावी. लोकसभा निवडणुकीच्या काळात एक गोष्ट पाहायला मिळाली की,ज्या गावात स्वाभिमानी पक्ष इतर पक्षाला प्रवेश देत नव्हता, त्यांच गावात राजू शेट्टींना प्रवेश दिला नाही. एवढा शेतकऱ्यांमध्ये अविश्‍वास का झाला. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या संघटनेप्रमाणेच राजू शेट्टी यांच्या संघटनेनेही उभारी घेतली होती. मात्र त्यांचे सहकारी का सोडून चाललेत. यांची शेट्टी यांनी यांचे चिंतन करावेत. 

मी आयोगाचा अध्यक्ष आहे. मला जिथं धोरण ठरतात. तिथं बोलायची संधी आहे. जे विषय देतो त्यावर चर्चा होते. राजू शेट्टी हे माझे ज्युनिअर आहे. मी प्रदेशाध्यक्ष असताना राजू शेट्टी तालुका अध्यक्ष होते, म्हणजेच गुरु-गुरु असतो. हे शेट्टी यांनी समजून घ्यावेत. असेही पाशा पटेल यांनी यावेळी सांगितले. 
क्‍लायमेंट चेंजसाठी कम्युनिटी रेडिओ 
हवामानातील बदल आणि शेतीचे होणारे नुकसान यांचा आभ्यास करीत शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यासाठी आम्ही कम्युनिटी रेंडीओ सुरु करत आहोत. 
शेतकऱ्यांना विषयी संशोधन आणि आभ्यास करीत आहे. यामुळे पटेल हे मोठे काम करावेत असे शेट्टींनी सांगायला हवे होते. असेही पटेल म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT