विश्लेषण

मराठवाड्यातून मुख्यमंत्र्यांचा विश्‍वासू सहकारी निवडणूक रिंगणात

सरकारनामा ब्युरो

पुणे : गेले अनेक दिवस ज्यांच्या नावाची चर्चा होती ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना भाजपने अखेर विधानसभेची उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर माजलगावमधून रमेश आडसकर यांची वर्णी लागली आहे. आष्टीमध्ये भीमराव धोंडे यांना पक्षाने संधी दिली आहे. त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून फुलंब्रीमधून बागडे यांना पुन्हा एकदा पक्षाने उमेदवारी दिली आहे. 

मराठवाड्यातल्या विविध मतदारसंघातील उमेदवार पक्षाने जाहीर केले मात्र या यादीत केज मतदारसंघातील नाव आज जाहीर झाले नाही. पक्षाची ही पहिली यादी जाहीर झाली अजून 41 उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT