Fadnavis-Devendra
Fadnavis-Devendra 
विश्लेषण

जिंकणार्‍यांनी वाघासारखे वागायचे ,मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना सल्ला

सरकारनामा

कणकवली :  नितेश राणेंचा आक्रमकता हा स्थायीभाव आहे. भाजपच त्यांना संयमाचे धडे मिळतील, असे सांगत त्यांचा विजय निश्‍चीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे झालेल्या प्रचारसभेत केले. 

यावेळी माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्यासह नारायण राणेंचे सर्व समर्थक भाजपात दाखल झाले. तेथे नितेश राणेंच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा शेला घालून प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. 

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, “नितेश यांचा विजय निश्‍चित आहे. कणकवली किंवा महाराष्ट्रात कुठेही चुरस दिसत नाही. आपण जिंकणार आहोत. यामुळे जिंकणार्‍यांनी वाघासारखे वागायचे. निवडणूक शांततेत आणि प्रेमाने लढवा. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची स्थिती अत्यंत वाईट आहे. जनादेश मोदींसोबत आहे.”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT