Praful Patel
Praful Patel  Sarkarnama
विश्लेषण

Sharad Pawar Announces Resignation: प्रफुल्ल पटेल हात जोडून विनंती करत होते; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मागे हटायला तयार नव्हते!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : जयंतराव, मी, अजित पवार आजच शरद पवारसाहेब (Sharad Pawar) यांच्यासोबत चर्चा करू. आम्ही हात जोडून विनंती करतो. जे तुमच्या मनात आहे, तेच आमच्या मनात आहे. तुमची भावना आम्ही साहेबांपर्यंत पोचवतो. आम्ही साहेबांशी चर्चा करू, अशी विनंती खासदार प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) कार्यकर्त्यांना करत होते. मात्र, कार्यकर्ते आणि नेते ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते मागे हटायला तयार नव्हते. (Praful Patel was pleading with folded hands; NCP activists were not ready to back down!)

पटेल म्हणाले की, शरद पवार यांच्या याचाही विचार करावा लागेल. आपण सर्वजण त्यांच्याबरोबर राहूनच मोठे झालो आहोत. त्यांचं वय, प्रकृती लक्षात घ्या. त्यांच्या जेवणाची वेळ झालेली आहे. त्यांना जाऊ द्या. आम्ही सर्वजण विनंती करतो, तुमच्या मनासारखा निर्णय घ्यायचा असेल तर आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू द्यात. आम्हाला कोणालाही साहेब बोलले नव्हते, तुमच्या मनाप्रमाणे घडवून आणू द्या. पटेल विनंती करत असतानाच ‘तुम्ही पडदा लावून बोला आणि आम्ही मात्र येथेच बसतो,’ अशी भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते.

तुमचा निर्णय येईपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही. एकही व्यक्ती सभागृहाच्या बाहेर जाणार नाही. पण, आता आमचं तुम्हाला ऐकावं लागेल, अशी विनंती कार्यकर्ते शरद पवार यांना करत होते. पटेल म्हणाले की, पवारसाहेब राजकारणात कायम राहणार आहेत. ते राज्यसभेचे सदस्य राहणार आहेत, त्यामुळे आता तुम्ही आम्हा सर्वांचे ऐका. आम्ही साहेबांशी बोलतो, त्यानंतर तुमच्या मनातील निर्णय घेण्यासाठी त्यांना भाग पाडू.

जयंत पाटील काय म्हणाले?

आम्ही पवारसाहेबांच्या नावानं मतं मागतो, त्यांच्या नावाने पक्षाला मतं मागतात. तेच बाजूला गेले तर आम्ही कोणाला घेऊन लोकांसमोर जायचे. देशातील लोकांसाठी ते पक्षाचे अध्यक्ष असणे गरजेचे आहे. त्यांनी असा निर्णय घेणे, देशातील कोणत्याही व्यक्तीला मान्य नसेल. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा. शरद पवार यांच्या अनुभवाचा फायदा आम्हाला हवा आहे. आमच्या लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे पाहूनच राजकारण करत आलो आहोत. त्यांची स्फूर्ती घेऊन राजकारणात वावरतो. राजकारण करत आलो आहे. त्यांनी अलीकडच्या काळात भाकरी फिरवण्याचा उल्लेख केला होता. पवारसाहेब आम्ही तुम्हाला सर्व अधिकार देतो. पण, देशाच्या सवोच्च ठिकाणी तुमची जी प्रतिमा ती दुसरी कोणाला येणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT