Navneet Rana Politics : स्थानिक स्वराज संस्थांमधून विधान परिषदेसाठी आमदारांची निवड होणार आहे. ही निवडणूक जाहीर झाली असून महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा दिसून येईल. तब्बल 17 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत विरोधकांना कुठेही संधी दिसत नाही. मात्र, अमरावतीमध्ये ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.
भाजपकडून उमेदवारीसाठी माजी आमदार प्रवीण पोटे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, पोटेंना रवी राणा यांनी उघडपणे विरोध केला आहे. तर, नवनीत राणा देखील पोटेंच्या उमेदवारीच्या विरोधात असल्याच्या सांगितले जात आहे. त्यामुळे पोटेंच्या उमेदवारीमध्ये 'राणा' फॅक्टर अडसर ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवनीत राणा या लोकसभेला उमेदवार होत्या तेव्हा प्रवीण पोटे यांनी नवनीत राणांना उघडपणे विरोध केला. त्यांच्या समर्थकांनी राजीनामा देण्याची देखील तयारी दर्शवली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केली आणि प्रवीण पोटे हे नवनीत राणांच्या प्रचारात सक्रीय झाले.
नवनीत राणांना लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे पोटेंनी दगाफटका केल्याचा संशय असल्याची चर्चा आहे. त्यातूनच पोटेंच्या उमेदवारीला विरोध केल्या जात असल्याचे बोलेले जात आहे.
प्रवीण पोटे यांनी 2012 ते 2024 यांनी असे सलग नेतृत्व केले आहे. पक्षाकडून त्यांचे नाव निश्चित मानले जात होते. मात्र, भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे यांचे नाव समोर आले असून नवनीत राणा या नावाबाबत सकारात्मक असल्याचे बोलेल जात आहे. तर, रवी राणा यांनी पोटे यांना उमेदवारी दिली तर स्वतंत्र उमेदवार रिंगणार उतरवू असे संकेत दिल्याने पेच निर्माण झाला आहे.
स्थानिकमधून उमेदवार निवडून जाणार आहे. त्यामुळे मित्रपक्षांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षातील संख्या पाहाता भाजप गाफिल राहणार नाही. या स्थितीमध्ये रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाची 26 मते निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
भाजप - १५२
शिवसेना - २०
राष्ट्रवादी (अजित पवार )- ३२
युवा स्वाभिमान पक्ष- २६
काँग्रेस- ११९
एमआयएम -१६
बीएसपी - ३
उबाठा - १८
प्रहार-२१
समाजवादी पार्टी - २
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष- १३
भाकप - १
वंचित बहुजन आघाडी - ६
अपक्ष - २४
एकूण मतदार ४५३ इतके आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.