विश्लेषण

विश्वास नांगरे पाटील यांची  पालखीमार्गावर सायकल वारी 

सरकारनामा ब्यूरो

सासवड : पालखीमार्गावरील सुरक्षितता जवळून पाहता यावी यासाठी पंढरपूरपर्यंत पालखीमार्गावर सायकलद्वारे निघाल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

 
सोमवारी सकाळी साडेसहाला नांगरे पाटील हडपसरहून सासवड (ता. पुरंदर) येथे पालखीतळापर्यंत सायकलने आले. त्यांच्या समवेत पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सासवडचे पोलिस उपअधीक्षक अशोक भरते, पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील आदी होते. नांगरे पाटील यांचा हा सायकल प्रवास सुमारे 218 किलोमीटरचा आहे. 

पालखी बंदोबस्ताबाबत सारे नियोजन झाल्याचे अहवाल येतात. मात्र, मी अगदी बारकाईने व्यवस्था पाहतो आहे. रस्त्यालगत कुठे खड्डे आहेत, कुठे माती वा मुरमाचे ढीग पडले आहेत, काही धोकादायक ठिकाणे आहेत का, दहशतवादी कारवाई होऊ शकेल अशी ठिकाणे आहेत, हे सारे जवळून पाहता येते आहे. वारीत अडथळा नको म्हणून एक-दोन दिवस अगोदर पुढे आढावा घेत व पाहणी करीत जात आहे, असे नांगरे पाटील यांनी सांगितले. 

सासवडला पालखीतळावर व्यायाम करणाऱ्या मंडळींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सासवड नगरपालिकेत त्यांनी पालखी नियोजनाची बैठक घेतली. तसेच विविध सूचना करून ते सायंकाळी जेजुरीकडे रवाना झाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT