विश्लेषण

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच माझ्याविरोधात आरोप - नगरसेवक दगडे पाटील

सरकारनामा ब्युरो

पुणे - ``मी कुठल्याही प्रकारची अडवणूक केली नसून, उलट माझी स्वतःची कचरा गाडी बावधनचा पूर्ण कचरा उचलत आहे. अनेक विकास कामे मी करत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे," असे बावधन-कोथरुडचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी `सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

"माननीयां'च्या पत्नीप्रेमामुळे बावधनवासियांच्या तोंडचे पाणी पळाले!' या मथळ्याखाली `सरकारनामा'मध्ये आज प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात नगरसेवक दगडे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

नगरसेवक दगडे पाटील यांनी कळवले आहे, की बावधन बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांपासून कॉंग्रेसची सत्ता आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही. उलट लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आता तो उघडकीस येईल याची भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची खोटी माहिती सांगत आहे. त्यांनी जाणूनबुजून महापालिकेचा पाण्याचा टॅक्स भरला नाही. निवडणूक जवळ आल्यामुळे त्यांनी २५ लाखांचे बेंच वाटून त्यातही भ्रष्टाचार केला. ते भारतीय जनता पार्टी व माझी निवडणुकीमध्ये बदनामी करून लोकांची फसवणूक करत आहे. आता त्यांना त्यांचा पराभव नजरेसमोर दिसू लागल्यामुळे ते सध्या बिनबुडाचे आरोप करत आहेत." 

``निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आर.पी.आय. यांनी अधिकृत पुरस्कृत केले आहे समोरचे पॅनेलला कुठलाही अधिकृत पुरस्कृत केलेले नसताना ते भारतीय जनता पार्टीचे नाव वापरात आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत,'' असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT