विश्लेषण

नीरव मोदीला पैसे देणारा आमच्या कॉलेजचा नाही : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो

पुणे: आमच्या बीएमससीसी कॉलेजमधून अनेक गुणवंत विद्यार्थी बाहेर पडले, ते आज मोठ्या बॅंकांत प्रशासक आहेत. नीरव मोदीला पैसे देणारा मात्र आमच्या कॉलेजचा नाही. यासंबंधीची खात्री मी केली आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

येथील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर शरद पवारांची बहुचर्चित मुलाखत नुकतीच सुरु झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुलाखत घेत आहेत. शरद पवार हे बीएमसीसीचे विद्यार्थी. यासंदर्भाने सांगा, अशी सुरवात राज ठाकरे यांनी केली. त्याला उत्तर देत असताना पवारांनी विद्यार्थीदशेचे अनुभव सांगितले. ते म्हणाले, आमच्या कॉलेजने अनेक विद्यार्थी देशाला दिले. ते मोठ्या बॅंकांमध्ये प्रशासक आहेत. राम नाईक हेही याच कॉलेजचे आहे. ते दुष्काळी आटपाडी तालुक्‍यातून आले. ते खासदार, केंद्रिय मंत्री झाले. आता ते उत्तर प्रदेशचे राज्यपाल आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT