Raghunath Mohapatra two sons die within days of their fathers demise
Raghunath Mohapatra two sons die within days of their fathers demise 
विश्लेषण

कोरोनाने कुटुंब उध्वस्त : आधी माजी खासदार अन् काही दिवसांतच दोन्ही मुलांचा मृत्यू

वृत्तसंस्था

भुवनेश्वर : देशात कोरोना (Covid19)  संसर्गाची दुसरी लाट आली आहे. जगात रोजचे सर्वाधिक कोरोना मृत्यू  (Covid Deaths) भारतात होत आहेत. या महामारीपासून (Pandemic) संपूर्ण कुटुंबे उध्वस्त झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. राज्यसभेचे माजी खासदार व पद्मविभूषण रघुनाथ महापात्रा (Raghunath Mohpatra) यांचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला होता. काही दिवसांतच त्यांच्या दोन्ही मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

रघुनाथ महापात्रा हे ख्यातनाम शिल्पकार आहेत. त्यांना सरकारने पद्मविभूषण देऊऩ सन्मानित केले होते. ते राज्यसभेचे माजी सदस्य होते. महापात्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांनी भुवनेश्वरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 9 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. 

यानंतर त्यांचा लहान मुलगा प्रशांत याला कोरोना झाला. तो ओडिशाच्या रणजी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होता. त्याचा 19 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला. रघुनाथ महापात्रा यांचा मोठा मुलगा यशवंत हा शिल्पकार आहे. त्यालाही कोरोना संसर्ग झाला होता. त्याची तब्येत बिघडल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचा 20 मे रोजी मृत्यू झाला. आधी रघुनाथ महापात्रा आणि त्यांच्यानंतर दोन्ही मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

देशात 24 तासांत 4 हजार 209 जणांचा मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 59 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाख आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 331 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

देशातील रुग्णसंख्या कमी होत असून 21 एप्रिलनंतर प्रथमच 17 मेपासून रोजची रुग्णसंख्या 3 लाखांच्या खाली आली आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच वेगाने रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होऊ लागली आहे. यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचे सूर सरकारमधून व्यक्त होत आहे. तरीही मृत्यूचा आकडा वाढत असून, याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. 

देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, आता ती 30 लाखांवर आली आहे. सक्रिय रुग्णांची जास्त असल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 30 लाख 27 हजार 925 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 11.63 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 87.25 टक्के आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 2 कोटी 27 लाख 12 हजार 735 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.12 टक्के आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT