विश्लेषण

नाही नाही म्हणता राज ठाकरेंना ईडीची नोटीस : 22 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अमंलबजावणी संचनालयाने (ईडी) दादर येथील कोहिनूर मिल व्यवहाराप्रकरणी नोटीस पाठवल्याची माहिती पुढे आली आहे. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजार राहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भाजपकडून सुडबुध्दीने राजकरण केले जात जात असून या व्यवहारातून आपण 2008 मध्येच बाहेर पडलो होतो. त्यामुळे त्याच्याशी आता काही संबध नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते. या नोटिसीमुळे राजकीय पडसाद उमटू लागले असून हे सुडबुध्दीचे राजकारण असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी केला.

दिवाळखोरीत निघालेल्या "आयएल ऍन्ड एफएस' या कंपनीच्या व्यवहारांची तपासणी सध्या "ईडी'मार्फत सुरु आहे. त्यात कोहिनूर मिलचा भूखंड या कंपनीसह माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या मुलगा उन्मेश जोशी यांनी भागीदारीत खरेदी केला होता. उन्मेश जोशी यांच्या कंपनीत राज ठाकरे यांची भागीदारी आहे. मात्र, काही काळाने "आयएल ऍन्ड एफएस' या कंपनीने त्यांचा 255 कोटी रुपयांचा हिस्सा 90 कोटी रुपयांमध्ये जोशी यांच्या कंपनीला विकला.

कालांतराने जोशी यांनी "आयएल ऍन्ड एफएस'कडून 500 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज फेडू न शकल्याने ही जागा उन्मेश जोशी यांनी या कंपनीला दिली. हा व्यवहार 2011 मध्ये झाला, मात्र त्याची नोंदणी 2017 मध्ये झाली. त्यामुळे हा व्यवहार संशयास्पद असल्याने राज ठाकरे यांना नोटीस पाठवली जाण्याची शक्‍यता यापूर्वीच व्यक्त केली जात होती. 22 ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT