Rajani Patil twitter
विश्लेषण

रजनी पाटलांसाठी बाळासाहेब थोरात घालणार भाजपला साकडे

थोरात यांनी भाजपला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला दिला

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील (Rajni Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज (ता. २२ सप्टेंबर) रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे नेते व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Bhalasaheb Thorat), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), हे देखील उपस्थित होते. (Rajani Patil files nomination for Rajya Sabha)

या निवडणुकीसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरला आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी म्हटले आहे. थोरात यांनी भाजपला महाराष्ट्राच्या परंपरेचा दाखला दिला. आत्तापर्यंतची राज्याची परंपरा अशी आहे की जेव्हा निधनासारखी दुर्दैवा घटना घडते, त्यावेळी आपण निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करून बिनविरोध निवडणूक करतो. मला खात्री आहे की विरोधी पक्ष म्हणून त्यांची काही भूमिका असली, तरी ते आपल्या परंपरेशी बांधील राहतील व निवडणूक बिनविरोध करतील. यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, असे थोरात यांनी म्हणाले आहे.

राज्यसभेची ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तर रजनी पाटील म्हणाल्या, पक्षाने माझ्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली, ती निवडणूक जिंकू पार पाडेन. राज्यसभेत आम्ही आक्रमक असल्याचे पाटील यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या यादीत रजनी पाटील यांचे नाव आहे. सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केल्याच्या पहिल्या दिवसापासून रजनी पाटील सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जातात. पाटील यांना एनएसयुआय' च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT