नागपूर : नाराज शिवसेनेला राजी करण्यासाठी राज्यसभेचे उपसभापतीपद देण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा दाखली असल्याचे समजते. बदललेल्या परिस्थितीत हरेक फ्रेंड जरुरी होता है। हे लक्षात आलेल्या मोठ्या भावाने 18 जूलै रोजी सुरु होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या अगोदर शिवसेनेशी संपर्क साधला आहे.
विश्वासनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्रातील निकटवर्तीयांनी सेनेशी संपर्क साधला आहे. महाराष्ट्रातील विधान परिषदेतले बदललेले सत्ता समिकरण लक्षात घेता आगामी काही महिन्यातच विधान परिषदेचे उपसभापतीपदही सेनेला देण्याची तयारी या नेत्याने दर्शवली असल्याचे समजते.
महाराष्ट्रात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या या चर्चेला सांगली महापालिकेत आघाडी करुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीने दुजोरा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्याने या संदर्भातील सुरुवात सांगली या स्वत:च्या जिल्ह्यातून करण्याची तयारी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दाखविली,
ती प्रत्यक्षा आणून कॉंग्रसेच्या विश्वजीत कदम, प्रतिक पाटील, सतेज पाटील यांनी आघाडी केलीही. ही विरोधकांच्या एैक्याची सुरुवात असल्याचे पश्चिम महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांना कळवले आहे.
शिवसेनेला या परिस्थितील समवेत घेणे अत्यावश्यक असल्याचेही सांगण्यात आले. नाणार संबंधात नाराज असलेल्या शिवसेनेला विविध विषयांवर राजी करण्यासाठी बरोबर घेण्याचा प्रारंभ राज्य सभेतील उपसभापती पदापसून करावा असे पूर्वीपासून बोलले जात होते. प्रा. कूरीयन उपसभापती पदावरुन निवृत्त झाले तेव्हांही सेनेला हा प्रस्ताव पाठविला गेला होता. दोन दिवसांपूर्वी नव्याने या विषयावर सेनेला निरोप पाठवण्यिात आल्याचे भाजपातील सुत्रांनी सांगितले. महाराष्ट्रातही आपण परिषदेत भाजपचा सभापती आणि शिवसेनेचा उपसभापती असे समिकरण विचाराअंती प्रत्यक्षात आणू शकतो असेही सुचविण्यात आले.
शिवसेनेचे पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेचे उपसभापती पद स्विकाराण्यास होकार द्यावा, लोकसभेचा अध्यक्षपदाचा मानही शिवसेनेला मनोहर जोशी यांच्या रुपाने देण्यात आला होता. मात्र, शिवसेने अद्याप या विषयात कोणताही निर्णय घेतला नसल्याचे समजते.
सत्तेतील लोकांना हे पद घ्यावे असे वाटत असले तरी, पक्षातील आक्रमक गटाचा आता कोणतेही पद घेण्यास विरोध असल्याचे समजते. शिवसेनेचे राज्यसभोत संजय राउत आणि अनिल देसाई असे दोन महत्त्वाचे खासदार आहेत. राऊत यांना हे पद दिल्यास त्यांची आक्रमक भूमिका आपोआप मवाळ होईल असेही सांगण्यात येते.
या संदर्भात शिवसेनेने महत्त्वाच्या नेत्यांशी अतर्गत चर्चा केल्याचेही सांगण्यात येते आहे.खासदार संजय राउत यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, अशा ऑफर्स येत असतात, या संबंधातला निर्णय पक्षप्रमूख उद्धव ठाकरेच घेऊ शकतात असे त्यांनी नमूद केले.
अकाली दलापेक्षा शिवसेनेला समवेत घेतल्यास राज्यसभेतील या समिकरणामुळे भाजपला फायदा होईल असे काही नेत्यांचे मत आहे. मात्र शिवसेना ताठर भूमिका सोडेल काय? या बद्दल सध्या भाजपतही सभ्रम असल्याचे समजते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.